Nana Patekar : नाना पाटेकर यांनी अक्षय कुमारचे केले कौतुक ; केली हॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्याशी तुलना !

Nana Patekar on Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत त्याची तुलना एका महान अभिनेत्याशी केली.
akshay kumar and nana patekar
akshay kumar and nana patekarSaam TV
Published On

Nana Patekar : बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीची ४ दशके चित्रपटसृष्टीला दिली आणि आजही ते चित्रपट जगतात सक्रिय आहेत. नानांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कधी नाना ॲक्शन चित्रपटांमध्ये दिसले आहेत, तर कधी ते कॉमेडी करताना दिसले आहे. २००७ मध्ये त्यांनी वेलकम या कॉमेडी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्याने आपल्या कॉमिक टायमिंगने सर्वांना प्रभावित केले. या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. आता नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्या सहकलाकाराची तुलना हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एका महान अभिनेत्याशी केली आहे.

नाना पाटेकर यांनी अक्षयचे कौतुक केले

हॉलिवूड चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज कलाकार झाले आहेत. मार्लन ब्रँडो या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून आजही लोक अनेक धडे शिकत असतात. आता एका मुलाखतीदरम्यान, बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी सुपरस्टार अक्षय कुमारची तुलना मार्लन ब्रँडोसोबत केली आहे.

akshay kumar and nana patekar
Top 10 Indian Actors : ना शाहरुख ना सलमान…, 'या' अभिनेत्याला बघायला आवडते प्रेक्षकांना !

नाना पाटेकर यांनी सांगितले की, वेलकम या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार त्याचे संवाद वाचण्यासाठी बोर्डवर ओळी लिहून वाचत असे, मी पाहिले होते. कमी वेळात संवाद वाचून चेहऱ्यावर भाव आणणे इतके सोपे नाही. अक्षयने यात प्रभुत्व मिळवले आहे. मी असं करू शकत नाहीत. पण अक्षय हे उत्तम प्रकारे करू शकतोत्यामुळे तो माझ्यामते एक उत्तम अभिनेता आहे.

akshay kumar and nana patekar
Allu Arjun Case : तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर पुष्पराजचा पलटवार ; म्हणाला,'लोक मला २० वर्षांपासून...'

अक्षय कुमारची तुलना मार्लन ब्रँडोशी

यानंतर नाना पाटेकर यांनी मार्लन ब्रँडोच्या एका जुन्या कथेचा संदर्भ देताना सांगितले की, पॅरिसमधील लास्ट टँगो या चित्रपटादरम्यान मार्लन ब्रँडो आपल्या संवादांच्या ओळी विसरत असताना, त्यांनी ते संवाद त्यांच्या एका कॉस्टारच्या पाठीवर लिहिले होते. आणि एक इंटिमेट सीन करताना तो डायलॉग वाचून शूट करायचा. नाना पाटेकर यांनी ही घटना सांगितली आणि अक्षय कुमारची तुलना मार्लन ब्रँडोशी केली. गॉडफादरसारख्या चित्रपटांचा एक भाग असलेल्या मार्लन ब्रँडोला चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील महान अभिनेत्यांपैकी एक मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com