Top 10 Indian Actors : ना शाहरुख ना सलमान…, 'या' अभिनेत्याला बघायला आवडते प्रेक्षकांना !

Top 10 Indian Actors : शाहरुख खान, सलमान खान हे लोकांचे सर्वात आवडते कलाकार म्हणून ओळखले जातात. पण, अलीकडेच नोव्हेंबरच्या टॉप १० अभिनेत्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीनुसार कोणता अभिनेता प्रेक्षकांचा आवडता आहे जाणून घेऊयात.
salman and shahrukh
salman and shahrukhGoogle
Published On

Top 10 Indian Actors : सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र, यंदा हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी चांगलाच परफॉर्मन्स दिला आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या शेवटी समोर आलेले आकडे दाखवतात की या वर्षाच्या टॉप लिस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या अनेक बड्या बॉलीवूड स्टार्सच्या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, दर महिन्याप्रमाणे या वेळीही Ormax ने देशातील टॉप कलाकारांची यादी जाहीर केली आहे.

कोणत्या अभिनेत्याने आपल्या चित्रपटांद्वारे लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे, हे दर महिन्याला या यादीद्वारे कळते. या महिन्याच्या यादीबद्दल बोलायचे झाले तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टॉप 10 लिस्टमध्ये फक्त दोनच बॉलीवूड स्टार्सचे नाव आहे. तर साऊथच्या स्टार्सनी ८ नावं काबीज केली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत सलमान खानचे नाव नाही.

salman and shahrukh
Celebrity Masterchef : आता सेलिब्रिटी होणार मास्टर शेफ; तेजस्वी-निक्की अन् उषा नाडकर्णी किचनमध्ये करणार कल्ला, पाहा VIDEO

दक्षिणेचे वर्चस्व कायम आहे

ओरमॅक्सच्या टॉप १० अभिनेत्यांमध्ये दक्षिणेतील अभिनेता प्रभासचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी प्रभास 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. माहितीनुसार, या चित्रपटाने देशभरात ६४६.३१ कोटी रुपये आणि जगभरात १०४२.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यादीत दक्षिणेतील एका अभिनेत्याचे नावही दुसऱ्या क्रमांकावर आहे.

salman and shahrukh
Allu Arjun Case : तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर पुष्पराजचा पलटवार ; म्हणाला,'लोक मला २० वर्षांपासून...'

शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर आहे

या वर्षी, थलपथी विजय त्याच्या ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ या शानदार चित्रपटासह दिसला. या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता अल्लू अर्जुनचे नाव आहे, ज्याच्या 'पुष्पा 2'ने बॉक्स ऑफिसवरधुमाकूळ घातला आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या नावाचा चौथ्या क्रमांकावर समावेश आहे. या वर्षी त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी त्याचा 'किंग' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

अक्षय कुमार शेवटच्या स्थानावर

या यादीत ज्युनियर एनटीआरचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे, यावर्षी त्याचा 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सहाव्या क्रमांकावर असलेल्या साऊथच्या बड्या स्टार्समध्ये अजित कुमारचे नाव सामील आहे. सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर महेश बाबू आणि सूर्या यांच्या नावांचा त्यात समावेश आहे. राम चरण याचे नाव नवव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. राम चरणचा 'गेमचेंजर' हा चित्रपट 2025 साली प्रदर्शित होणार आहे. तर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव दहाव्या आणि शेवटच्या स्थानावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com