Celebrity Masterchef : आता सेलिब्रिटी होणार मास्टर शेफ; तेजस्वी-निक्की अन् उषा नाडकर्णी किचनमध्ये करणार कल्ला, पाहा VIDEO

Farah Khan : 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' हा शो आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे होस्टिंग फराह खान करणार आहे. या शोमध्ये अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहेत.
Farah Khan
Celebrity Masterchef SAAM TV
Published On

अनेकांच आवडता 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' (Celebrity Masterchef ) हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मास्टर शेफ' हा शो चाहते खूप आवडीने पाहतात आणि नवनवीन रेसिपी घरी बनवतात. मात्र यंदा त्याचे आवडते सेलिब्रिटी किचनमध्ये धमाकूळ घालताना पाहायला मिळणार आहेत. कलाकारांना आपले कुकिंग टॅलेंट दाखवण्याची उत्तम संधी मिळाली आहे.

'मास्टर शेफ' हा लोकप्रिय रिएलिटी शो जगभरात देखील चालतो. यंदा या शोमध्ये मनोरंजन कलाविश्वातील सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. नुकताच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामुळे सर्वत्र 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'ची चर्चा पाहायला मिळत आहे. या कुकिंग शोचे परीक्षक मास्टरशेफ विकास खन्ना आणि रणवीर बरार आहेत.

शेफ विकास खन्ना आणि रणवीर बरार यांचे चाहत दिवाने आहेत. यांच्या रेसिपी जगात भारी असतात. तर या खास शोच्या होस्टिंगची धुरा फराह (Farah Khan) खान सांभाळणार आहे. हा शो तुम्हाला लवकरच सोनी टीव्हीवर तुम्हाला पाहता येणार आहे. 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'च्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कलाकारांना आईस्क्रीम केक बनवण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे सेलिब्रिटी आपल्या कुकिंगने चाहत्यांच्या मनात घर करतील का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला अनेक खास सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत. ज्यात 'बिग बॉस 15' विजेता तेजस्वी प्रकाश, 'बिग बॉस मराठी 5' गाजवणारी निक्की तांबोळी पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, अर्चना गौतम, राजीव अदातिया, दीपिका कक्कर असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत.

Farah Khan
Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, तिसऱ्या शनिवारी किती कमावले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com