Nana Patekar : सनी देओलच्या 'गदर ३'मध्ये नाना पाटेकर साकारणार खलनायकाची भूमिका ! वाचा सविस्तर

Nana Patekar : 'गदर: एक प्रेम कथा' आणि 'गदर 2'च्या ब्लॉकबस्टरनंतर आता 'गदर 3'चीही चर्चा आहे. काही काळापूर्वी नाना पाटेकर तिसऱ्या भागातही असू शकतात अशी चर्चा होती. आता नाना पाटेकर यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
nana patekar sunny deol
nana patekar sunny deolSaam TV
Published On

Nana Patekar : अनिल शर्माचा 'वनवास' हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाना पाटेकर वेगवेगळ्या शोमध्ये दिसत आहेत. अनिल शर्माच्या आगामी 'गदर ३' या चित्रपटात नाना पाटेकर खलनायकाच्या भूमिकेत काम करणार असल्याची बातमी अलीकडेच आली होती. यावर नानांना प्रश्न केला असता त्यांनी या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले.

नाना पाटेकर या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, “नाही नाही… हे एकच उत्तर आहे. सनी देओलने मला पडद्यावर थप्पड मारली तर बरं वाटणार नाही.” यानंतर नाना पाटेकर यांना नायक आणि खलनायक म्हणून सनी देओलसोबतची त्यांची जोडी पडद्यावर चांगली दिसणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर नाना म्हणाले की ते शक्य होणार नाही. सनी देओलसोबत काम करण्याबाबत तो म्हणाला की, जर त्यांना कोणताही चांगला प्रोजेक्ट मिळाला तर ते नक्कीच एकत्र काम करतील.

nana patekar sunny deol
Hera Pheri 3 : राजू, श्याम आणि बाबू भैय्याची टोळी १८ वर्षानंतर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नाना पाटेकर यांनी सांगितली नवी कल्पना

'गदर 3' ची कथा कशी असावी याबद्दल नाना पाटेकरही थोडं विनोदी बोलले. नाना म्हणाले, “कथा अशीच असावी, मी तिथला आहे, तो इथला आहे. भांडणाचा मुद्दा नसावा." काही काळापूर्वी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती आणि नाना 'गदर 3' मध्ये दिसणार की नाही हे सांगितले होते. शक्य झाल्यास नानांना त्या चित्रपटाशी नक्कीच जोडेन, असे ते म्हणाले होते.

nana patekar sunny deol
Boney Kapoor : 'श्रीदेवी माझ्या आजूबाजूला आहे...', बोनी कपूर पत्नी श्रीदेवीची आठवण काढत झालवे भावूक

'वनवास'

‘वनवास’ हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. नाना पाटेकर आणि उत्कर्ष सोबतच सिमरत कौर आणि राजपाल यादव हे कलाकारही या चित्रपटात आहेत. पहिल्या दिवशी हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ६० लाख रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com