
Hera Pheri 3 : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कल्ट कॉमेडी चित्रपटाच्या पुढच्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला चित्रपट म्हणजे हेरा फेरी ३. हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाबद्दल गेल्या काही वर्षांत विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, अक्षय कुमारनेही या कॉमेडी फ्रँचायझीपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती, परंतु नंतर परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनी त्याच्या पुनरागमनाही माहिती प्रेक्षकांना दिली. पण आता हेरा फेरी 3 संदर्भात एक बातमी समोर आली आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा हेरा फेरी 3 पुन्हा चर्चेत आला आहे.
हेरा फेरीचे कलाकार एकत्र दिसले
2000 मध्ये कॉमेडी किंग दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली हेरा फेरी हा चित्रपट तयार झाला होता. ज्यामध्ये राजू (अक्षय कुमार), श्याम (सुनील शेट्टी) आणि बाबू राव (परेश रावल) यांची टोळी एकत्र दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि त्याचा सिक्वेल हेरा फेरी २००६ मध्ये आला आणि त्याला देखील प्रचंड यश मिळाले. आता लवकरच या चित्रपटाच्या तिसऱ्या भाग प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
‘हेरा फेरी ३’ ची घोषणा व्हिडिओही गेल्या वर्षी शूट करण्यात आली होती. त्यानंतर चित्र अडकल्याची बातमी आली. हा चित्रपट बनवणारे निर्माते फिरोज नाडियादवाला आणि निर्मिती कंपनी इरॉस यांच्यात चित्रपटाच्या हक्काबाबत वाद सुरू झाले होते. मात्र आता हा गोंधळ दूर झाला आहे. 'हेरा फेरी 3'चा मार्ग मोकळा झाला आहे.
फिरोज नाडियादवाला यांनी 'हेरा फेरी', 'वेलकम', 'आवारा पागल दीवाना' सारखे कॉमेडी चित्रपट केले आहेत. काही काळापूर्वी या तिघांचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा होती. 'वेलकम ३' तयार होत आहे. ‘आवारा पागल दिवाना’च्या पुढच्या भागाचीही चर्चा होती. पण सध्या ते होल्डवर आहे. ‘हेरा फेरी ३’ही बनवला जात आहे. पण त्याच्या जुन्या चित्रपटांचे हक्क इरॉसकडे होते. आता फिरोजने इरॉसला पैसे देऊन सर्व चित्रपटांचे हक्क घेतले आणि हा वाद संपला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.