
Govinda Birthday : १९९७ साली प्रदर्शित झालेला 'हिरो नंबर 1' हा अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेता गोविंदा यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि कथा लोकांना खूप आवडली. त्यावेळी डेव्हिड धवनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने कमाल केली होती. 'हीरो नंबर 1' रिलीज होऊन जवळपास 27 वर्षांनंतर एक रंजक गोष्ट समोर आली आहे.एका मुलाखतीत, अभिनेता अभिषेक बॅनर्जीने हिरो नंबर 1 या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला. 'मोहब्बत की नहीं जाती' या चित्रपटाच्या सुपरहिट गाण्याच्या शूटिंगदरम्यान गोविंदाचा एक गंमतीदार किस्सा सांगितला.
अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर अभिषेक बॅनर्जीने अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, 'एकदा डेव्हिड सरांनी मला सांगितले 'हिरो नंबर १' मधील मोहब्बत की नही जाती या गाण्याच्या चित्रीकरणाची परवानगी पॅरिसमध्ये नव्हती. गाणे तिथे चित्रीत करायचे होते पण काही होत नव्हते. 'डेव्हिड सर आणि संपूर्ण टीम हॉटेलमध्ये बसून चर्चा करत होती. तेव्हा गोविंदा म्हणाला, संपूर्ण टीमसह डेव्हिड तू लोकेशनवर जा. सर्वजण आयफेल टॉवरजवळ पोहोचले आणि गोविंदा सरांनी कॅमेरा चालू करण्यास सांगितले, त्यानंतर त्यांनी १५ मिनिटांत ग्रुपसोबत सर्व डान्स स्टेप्स केल्या आणि तेथून निघून गेले आणि फक्त १५ मिनटात शूट झालं.
गोविंदा एक अप्रतिम अभिनेता आहे
याच मुलाखतीत अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाले, 'डेव्हिड सरांनी सांगितले होते की त्यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले होते, पण गोविंदामध्ये कामाची जी आवड आणि जादू होती कोणत्याच सुपरहिट चित्रपटात दिसली नाही गोविंदाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १९८६ मध्ये तन-बदन या चित्रपटातून पदार्पण केले होते परंतु त्याचा पहिला हिट चित्रपट लव ८६ होता.
'हिरो नंबर 1'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
21 फेब्रुवारी 1997 रोजी रिलीज झालेला हीरो नंबर 1 हा चित्रपट डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी यांनी केली होती. चित्रपटात गोविंदा, करिश्मा कपूर, कादर खान, हिमानी शिवपुरी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसले होते. हिरो नंबर १ चे बजेट 6.50 कोटी रुपये होते, तर या चित्रपटाने 30.88 कोटी रुपयांची कमाई केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.