Durgadi Fort News : तब्बल 48 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लागला दुर्गाडीचा निकाल, मुस्लिम पक्षकारांचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळला

Kalyan Civil Court : दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील निकाल आज कल्याण न्यायालयाने दिला. या निकालानंतर शिवसेना भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी न्यायालयाचे आभार मानले
Durgadi Fort
Durgadi FortSaamTv
Published On

अभिजीत देशमुख

कल्याण : दुर्गाडी किल्ल्यावर मजलिसे मुसावरीन औकाफ यांनी केलेल्या दाव्याची याचिका आज कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळली आहे. तब्बल 48 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लागलेल्या या निकलाचे शिवसेना भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केलं आहे.

कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने दावा सांगितला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तब्बल 48 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लागलेल्या या निकालाचे शिवसेना भाजप हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केलं आहे.

मुजलिसे मुशावरीन औकाफ ही मशीद संघटना आहे. या संघटनेच्या वतीने किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा करत हा दावा कल्याण न्यायालयात दाखल केला होता. हा दावा १९७४ पासून प्रलंबित होता. या दाव्याच्या आधारे ठाणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ले दुर्गाडी येथील सुरु असलेल्या सुशोभिकरणाच्या कामास हरकत घेण्यात आली होती. या दाव्या प्रकरणी यापूर्वी न्यायालयाने जैसे थे आदेश दिले होते.

Durgadi Fort
Nylon Manja : नाशिकमध्ये ८० हजारांचा नायलॉन मांजा जप्त; यापुढे थेट हद्दपारीचा इशारा

आज या दाव्याची सुनावणी होती. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबत सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी ही जागा मजलिसे मुशावरीन औकाफ यांच्या कायदेशीर मालकीची नाही. त्याचा त्यावर अधिकार नाही. ही जागा शासनाची आहे. त्यांनी दाखल केलेला प्रलंबित दावा मुदतबाह्य असल्याने हा दावा फेटाळण्यात आला आहे.

Durgadi Fort
Ambajogai News : औषध पुरवठा करणाऱ्या विशाल एंटरप्राइजेसवर बंदी; स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठातांची माहिती, सप्लाय करणाऱ्या कंपन्याही बनावट

कल्याणचे प्रथमवर्ग दिवाणी न्यायधीश ए. एस. लांजेवार यांनी हा दावा फेटाळून लावला असल्याचे सांगितले. तर हा दावा फेटाळला असला दावेदारअपीलात जाऊ शकतो. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडीवर प्रचंड पोलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त ठेवला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतली असल्याचे सांगितले.

Durgadi Fort
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचे ₹७५०० अकाउंटला आले, लाडक्या दाजीने सरकारला केले परत; नेमका काय आणि कुठे घडला प्रकार?

शिवसेना, भाजपसह इतर संघटनांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, या निकालावर बोलताना शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील यांनी हा निकाल म्हणजे हिंदूचा विजय आहे. हा दावा काही धर्मियांना टाकला आहे. न्यायालयाने हिंदू धर्माला न्याय दिला आहे. सत्याचा विजय झाला असल्याचे सांगितले. तर, दुर्गाडी किल्ला हिंदूचाच गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेने सुरु ठेवलेल्या आंदोलनाला यश मिळाले. कल्याण येथील कोर्टाने दुर्गाडी किल्ला हिंदूचीच वहिवाट असल्याचा निर्णय दिला. मलंग गडाचाही निकाल लवकर लागावा असे ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

Durgadi Fort
Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची आणि जखमींची नावं आली समोर, वाचा संपूर्ण लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com