Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची आणि जखमींची नावं आली समोर, वाचा संपूर्ण लिस्ट

Kurla Accident News: कुर्ला बेस्ट बस अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमी आणि मृतांची नावं समोर आली आहेत...
Kurla BEST Bus Accident
Kurla BEST Bus Accident UpdateSaam Tv
Published On

कुर्ला पश्चिमेला सोमवारी रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला. भरधाव बेस्ट बस थेट मार्केटमध्ये घुसली. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सध्या भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामधील मृतांची आणि जखमींची नावं समोर आली आहेत.

या अपघातामध्ये कनिस अन्सारी (५५ वर्षे), आफरिन शाह (१९ वर्षे), अनम शेख (२० वर्षे)या महिलांचा मृत्यू झाला. शिवम कश्यप(१८ वर्षे, विजय गायकवाड (७० वर्षे) आणि फारूख चौधरी (५४ वर्षे) या पुरूषांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

तर ४ वर्षांची मुस्कात खान, मोहद इजाद, अशुतोष, अनिल शाह, फाजलू अहमद, तनवीर कुरेशी, मोहम्मद सैद, साबीर हुसैन, सुखराम, महेश कुमार, अमन खान, अतुल वनारे, अमर सातकर, दानिश मनसूरी, हरविंदर सिंग, अखतर खान, बशिरा शैख, सरोज कुमार, सुमेद सैय्यद, इरफान शेख, अफताब खान, रेहमुनीस्सा हे जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Kurla BEST Bus Accident
Kurla BEST Bus Accident: चूक कुणाची? ट्रेनिंग नसतानाही हातात स्टेअरिंग दिली, कुर्ला बस अपघात प्रकरणातील धक्कादायक माहिती

उमर अब्दुल गुफर याच्यांवर सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरिफ शेख, मेहरबान खान यांच्यावर कोहिनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रविंद्र भावसार, आकाश पराडे, संतोष कदम, विजय ठोंबरे हे पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर कोहिनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहम्मद मुस्ताफा, अफरोज अहमद, अजामतून शेख, मुजफ्फर शेख, फारूख चौधरी यांच्यावर हाबीब रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Kurla BEST Bus Accident
Kurla History: कुर्ला हे नाव कसं पडलं? आहे रंजक इतिहास

तर, पंकज सिंग, मेहताब शेख, रेहमत अन्सारी, मुस्तान शेख, फाजलू रेलेमा, सिद्धू कुमार यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फजिल मोहम्मद, सेहजल हिजेसटे यांच्यावर फौझिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद खान यांच्यावर कुर्ला नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताप्रकरणी बस चालक संजय मोरेला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Kurla BEST Bus Accident
Kurla Best Bus Accident : रस्त्यावरून चालायला जागा नाही, लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भीषण अपघातानंतर चाचाने केला आक्रोश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com