Subhash Ghai: ज्येष्ठ फिल्म निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात दाखल

Director Subhash Ghai Admitted In Hospital: ताल, परदेस आणि राम लखन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक सुभाष घई यांच्याबद्दल एक मोठी बातमी हाती आली आहे. सुभाष घई यांना लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती आहे. श्वसनाची समस्या तसेच अशक्तपणामुळे सुभाष घई यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
 Subhash Ghai
Director Subhash Ghai Admitted In HospitalIndia Today
Published On

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घई यांना वार्षिक तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाची समस्या तसेच अशक्तपणामुळे सुभाष घई यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सुभाष घई यांचा जन्म 24 जानेवारी 1945 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. ताल, परदेस, राम-लखन, खलनायक आणि मेरी जंग सारखे सदाबहार चित्रपट सुभाष घई यांनी बनवले आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. सुभाष घई यांच्या चित्रपटातील गाणी आणि सीन्स आजही लोकांच्या आठवणीत आहेत. सुभाष घई यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते, पण नशिबाने त्यांना यशस्वी दिग्दर्शक केलं.

 Subhash Ghai
Blockbuster Movies 2024: यंदाचं वर्ष कुणी गाजवलं, कोणत्या चित्रपटाची छप्परफाड कमाई? यादी एका क्लिकवर

राज कपूर यांच्यानंतर त्यांना इंडस्ट्रीतील दुसरे 'शो मॅन' म्हटले जाते. सुभाष घई यांनी त्यांच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत सुमारे 16 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, त्यापैकी 13 बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेत. 2006 मध्ये 'इकबाल' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सुभाष घई यांनी केवळ मोठे आणि ब्लॉक बस्टर चित्रपट बनवले नाहीत, तर अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी आपल्या चित्रपटातून लॉन्च केले आहे.

 Subhash Ghai
Ali Abbas Zafar : अली अब्बास जफरविरोधात गुन्हा दाखल करा, कोर्टाने का दिले आदेश? नेमकं प्रकरण काय?

सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपटांमधून जॅकी श्रॉफ, रीना रॉय, मीनाक्षी, माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला आणि महिमा चौधरी या कलाकारांना ब्रेक दिलाय. घई हे व्हिसलिंग वुड्स नावाची एक अभिनय संस्था चालवत आहेत. ही शाळा जगातील शीर्ष 10 चित्रपट शाळांपैकी एक मानली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com