2024 हे मनोरंजन सृष्टीसाठी खूप खास वर्ष ठरले. यावर्षी अनेक मोठे चित्रपट रिलीज झाले. ॲक्शन, रोमान्स, ड्रामाने जगभराला वेड लावले. imdbच्या रिपोर्टनुसार 2024मध्ये कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले आणि जगभरात किती कोटींची कमाई केली जाणून घ्या.
सध्या बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चित्रपट गाजत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.
कल्की २८९८ एडी या चित्रपटाने जगभरात 1052.5 कोटी कमावले आहे. कल्की २८९८ एडी हा चित्रपट 27 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता अमिताभ बच्चन, प्रभास हे तगडे कलाकार पाहायला मिळाले.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' चित्रपटने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. 'स्त्री २' ने जगभरात 858.4 कोटींची कमाई केली. या चित्रपटात 'रूह बाबा'ची भूमिका कार्तिक आर्यनने साकारली. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांना वेड लावले.
'गोट' (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) हा चित्रपट 5 सप्टेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात 460.3 कोटी कमावले. या चित्रपटात साउथ स्टार विजय मुख्य भूमिकेत आहे.
'देवरा पार्ट १'मध्ये योद्धाची कथा सांगितली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले. 27 सप्टेंबरला 'देवरा पार्ट १' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने 443.8 कोटी कमावले आहेत.
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणसोबत अनेक तगडे कलाकार पाहायला मिळाले आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात 378.4 कोटी रुपये कमावले.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या फायटर चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली. 25 जानेवारीला 'फायटर' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने 355.4 कोटी कमावले. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.
'अमरन' चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने जगभरात 330.2 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटात साउथ अभिनेत्री साई पल्लवी देखील आहे.
अजय देवगणचा 'शैतान' चित्रपट 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा हॉरर चित्रपट आहे. यात खलनायकाची भूमिका आर माधवन याने साकारली आहे. या चित्रपटाने जगभरात 211.06 कोटी कमावले आहे.
हनु मान हा चित्रपट 12 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने 296.5 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाला चाहत्यांना खूप प्रेम दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.