Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचे ₹७५०० अकाउंटला आले, लाडक्या दाजीने सरकारला केले परत; नेमका काय आणि कुठे घडला प्रकार?

Ladki Bahin Yojana News update : जालन्यातील लाडक्या भावाला सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे साडे सात हजार रुपये खात्यावर जमा झाले. त्यानंतर या भावाने सरकारला पुन्हा पैसे दिले.
भावाच्या बँक खात्यावर जमा झाले लाडक्या बहिणीचे ७५०० रुपये; पठ्ठ्याने सरकारला पुन्हा दिले,  कुठे घडला प्रकार?
Ladki Bahin Yojana Saam tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : राज्यभरातील हजारो महिलांना लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ मिळाला. राज्यभरातील हजारो महिलांना साडे सात हजार रुपयांचा लाभ मिळाला. या योजनेसाठी अनेक महिलांनी तासंतास रांगा लावून अर्ज भरले. याच लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ एका लाडक्या भावाला मिळाला. मात्र, या लाडक्या भावाने मिळालेले पैसे पुन्हा सरकारला दिले.

महाराष्ट्रातील जालन्यात हा प्रकार घडला. जालन्यातील लाडक्या भावाला लाडकी बहिणीचे साडे सात हजार रुपये मिळाले. जालन्यातील जळगावमधील सोमनाथमधील विलास भुतेकर यांना ७५०० रुपये मिळाले होते. विलास भुतेकर यांना ५ डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडे सात हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रसाशनाशी संपर्क साधून साडे सात हजार रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत दिले.

भावाच्या बँक खात्यावर जमा झाले लाडक्या बहिणीचे ७५०० रुपये; पठ्ठ्याने सरकारला पुन्हा दिले,  कुठे घडला प्रकार?
Solapur Traffic Police: सोलापुरात वाहतूक पोलिस अॅक्शन मोडवर, १२ हजार वाहनचालकांना पोलिसांच्या नोटिसा..

विलास भुतेकर म्हणाले, 'बायकोचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अनावधानाने माझा आधार क्रमांक लिहिला गेला. माझं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे. त्यामुळे माझ्या खात्यावर साडे सात हजार रुपये आले. त्यानंतर मी बँकेत चौकशी केली. पुढे आम्ही कलेक्टर ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना लाडकी बहीणी योजनेचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले. ५ डिसेंबर रोजी पैसे आले. ते आम्ही परत केले'

भावाच्या बँक खात्यावर जमा झाले लाडक्या बहिणीचे ७५०० रुपये; पठ्ठ्याने सरकारला पुन्हा दिले,  कुठे घडला प्रकार?
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या अर्जांची छाननी होणार? बहिणींनो, तुमचे 1500 रुपये होणार बंद?

जालन्यातील अशासकीय सदस्य संतोष ढेंगळे म्हणाले, असे प्रकार ठराविक आहेत. त्यांच्याकडून नजर चुकीने हे प्रकार घडले आहेत. महिलांचे आधारकार्ड हे त्यांच्या पतीच्या बँक खात्याला लिंक आहेत. त्यामुळे त्यांच्या योजनेचे पैसे त्यांच्या पतीच्या खात्यात जमा झाले आहेत. विलास भुतेकर यांचा सुरुवातीला फोन आला होता. त्यांना योजनेचे पैसे मंजूर झाले होते'.

भावाच्या बँक खात्यावर जमा झाले लाडक्या बहिणीचे ७५०० रुपये; पठ्ठ्याने सरकारला पुन्हा दिले,  कुठे घडला प्रकार?
Ladki Bahin Yojana: धुळ्यातील २१२४९ महिलांना पैसे आलेच नाहीत, ५ लाख लाडक्या बहि‍णींना मिळाला लाभ!

'त्यावेळी पैसे दुसऱ्या खात्यात वळवण्याचा निर्णय घेतला होता. या सारखे प्रकार रोखण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाला संपर्क साधण्यास सांगितले होते. तसेच महिलांचे पैसे पतीच्या खात्यात जमा झाले, त्यांना महिला आणि बालकल्याण विभागात जमा करण्याचे पत्र जाहीर केलं होतं, असे ढेंगळे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com