Solapur Traffic Police: सोलापुरात वाहतूक पोलिस अॅक्शन मोडवर, १२ हजार वाहनचालकांना पोलिसांच्या नोटिसा..

Solapur Traffic Police on Action Mode: बेशिस्त वाहनचालकांनो दंड भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा. 'या' तारखेपुर्वी दंड भरता येईल. दंड भरण्यापासून पळ काढाल तर..
Solapur Traffic Police
Solapur Traffic Police Saam Tv News
Published On

Solapur Traffic Police: सोलापूर शहरात वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. वाहतूक पोलिस आता अॅक्शन मोडवर आली असून, १२ हजार बेशिस्त वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. १४ डिसेंबरला लोकअदालीत उपस्थित राहून त्यांना दंडाची रक्कम भरावी लागणार असून, यामध्ये ७ हजार बेशिस्त वाहनधारकांना कोर्टाने समन्स बजावला आहे. तसेच ४०० चालकांचे वॉरंट काढण्यात आले आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून हे महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे.

Solapur Traffic Police
Pune-Solapur Road: पुणे-सोलापूर मार्गावर आज वाहतुकीत बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

वाहतूकीचे नियम तोडून वाहन चालविल्याप्रकरणी दंड आकारलेल्या वाहनधारकांना यापुर्वी वॉरंट, समन्स बजावण्यात येत होते. मात्र तरीही ते न्यायलयात हजर झाले नाहीत. अशा वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता योग्य ती कारवाई केली जाईल. शहरातून वाहन चालविताना मर्यादित वेग, दुचाकीवकर ट्रिपलसीट नको, विरूद्ध दिशेने वाहन चालवणे टाळणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह, कार चालविताना सीटबेल्टचा वापर, लेन कटिंग नको, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नको तसेच इतर काही वाहतूक नियम आहेत. तरीसुद्धा अनेक जण हे नियम सर्सास मोडतात. त्या बेशिस्त वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

सोलापुरात अशा बेशिस्त १२ हजार वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी लोकअदालतीच्या अनुषंगाने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांना दंड भरावाच लागेल. अन्यथा समन्स बजावून दंड भरणाऱ्यांवर वॉरंट काढला जाईल. त्यामुळे प्रत्येक बेशिस्त वाहनचालकांना दंड भरावाच लागेल. अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. वाहनचालकांनी नेमका कोणता नियम मोडला. याचा फोटो देखील देण्यात येतो. त्यामुळे शक्यतो कोणालाच चुकीचा दंड आकारण्यात येणार नाही. तसे झाल्यास दंड रद्द देखील करण्यात येईल.

Solapur Traffic Police
Solapur News : एटीएम फोडून २३ लाख लांबविले; बार्शी शहरात धाडसी चोरी

याबाबत सोलापूर शहरातील सहायक पोलिस आयुक्त सुधीक खिराडकर म्हणतात, 'येत्या १४ डिसेंबर रोजी सोलापुरात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांवर वाहतूक नियम मोडल्याने दंडात्मक कारवाई झाली. त्यांनी लोकअदालीत येऊन दंड भरावा. त्यापुर्वी त्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंडाची रक्कम भरता येईल. किंवा शहरातील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन हा दंड भरता येईल. याशिवाय वाहतूक पोलिसांकडील ई- चालनाच्या मशिनद्वारे देखील दंड भरता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com