Pune-Solapur Road: पुणे-सोलापूर मार्गावर आज वाहतुकीत बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर
Pune-Solapur Road Traffic ChangesSaam Tv

Pune-Solapur Road: पुणे-सोलापूर मार्गावर आज वाहतुकीत बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Pune-Solapur Road Traffic Changes:पुणे-सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान एम. पी. पेट्रोल पंपाजवळ जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
Published on

सचिन जाधव, पुणे

पुणे-सोलापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.या मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आज या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्ता टी जंक्शन दरम्यान एम. पी. पेट्रोल पंपाजवळ जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून हे काम सुरू होणार आहे. त्यासाठी पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या कामाच्या दरम्यान पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवास करताना प्रवाशांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Pune-Solapur Road: पुणे-सोलापूर मार्गावर आज वाहतुकीत बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

पुणे -सोलापूर मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी वाहतूक सरळ अर्जुन रस्ता, मम्मादेवी चौकमार्गे स्वारगेटकडे जाईल. त्यामध्ये कोणताही बदल नाही. स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना मम्मादेवी चौकात सरळ जाण्यास बंदी आहे. ही वाहने डावीकडे वळून बिशप सर्कल येथून उजवीकडे वळून सोलापूर रस्त्याला जातील. हा सर्व मार्ग एकेरी करण्यात येत आहे.

Pune-Solapur Road: पुणे-सोलापूर मार्गावर आज वाहतुकीत बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर
Pune Crime: मोड आलेले हरभरे खाल्ले, नवऱ्याला बेदम चोपले; बायकोविरोधात गुन्हा

सोलापूरवरून येणाऱ्या वाहनांना बंदी असून सदर वाहने ही सरळ मम्मादेवी चौक, गोळीबार चौकमार्गे इच्छित स्थळी जातील. डॉ. कोयाजी रस्त्याने येणारी वाहने हरप्रीत मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक, पूलगेट बस स्थानकामार्गे कोंढव्याला जातील. सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना मम्मादेवी चौकात उजवीकडे वळण्यास बंदी आहे. ही वाहने गोळीबार चौकातून सरळ आल्यावर उजवीकडे वळून लष्करमार्गे इच्छित स्थळी जातील.

Pune-Solapur Road: पुणे-सोलापूर मार्गावर आज वाहतुकीत बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर
Pune Crime: पुणे हादरले! ४८ तासांत ५ हत्येच्या घटना, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com