Pune Crime
Pune Crime News Saam tv

Pune Crime: पुणे हादरले! ४८ तासांत ५ हत्येच्या घटना, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही का?

Pune Police: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Published on

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार पुण्यात पाहायला मिळत आहे. अशामध्ये पुण्यामध्ये ४८ तासांमध्ये ५ हत्येच्या घटना घडल्या. यामुळे पुणे हादरले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या परिसरामध्ये या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नरे परिसरात गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून चार जणांनी १८ वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. लाथाबुक्यांनी, काठी आणि सायकलच्या साखळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

समर्थ भगत असं या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गौरव कुटे, अजिंक्य गांडले आणि राहुल लोहार या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली. तर सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतच मंगळवारी रात्री तीन अल्पवयीन तरुणांनी पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या केली केला.

Pune Crime
Pune News: विद्येच्या माहेरघरात चाललंय काय? उच्चशिक्षित तरुणांकडून ड्रग्जची विक्री; तिघांना अटक

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही असाच प्रकार घडलाय. रामटेक परिसरामध्ये मंगळवारी अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने वार करत मित्राची हत्या केली. रामटेकडी येथील जामा मस्जिद समोर ही घटना घडली. यश सुनिल घाटे असं हत्या झालेल्या मुलाचे नाव होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतलं.

Pune Crime
Pune News: शिक्रापूरमध्ये हत्येचा थरार, माजी उपसरपंचाचा दिवसाढवळ्या खून

चौथी हत्येची घटना वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. तर पाचवी हत्याची घटना कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. एकाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉग घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोन दिवसांमध्ये घडलेल्या या ५ हत्येच्या घटनांमुळे पुणे हादरले आहे.

Pune Crime
Pune News : बैलाची दोरी अडकल्याने दूरपर्यंत ओढला गेला; आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com