Pune Crime: वाघोली परिसरात गावगुंडांची दहशत! मध्यरात्री गाड्या जाळल्या, कोयते फिरवत वाहनांची तोडफोड; ४ जणांवर गुन्हा
Pune Breaking News:Saamtv

Pune Crime: वाघोली परिसरात गावगुंडांची दहशत! मध्यरात्री गाड्या जाळल्या, कोयते फिरवत वाहनांची तोडफोड; ४ जणांवर गुन्हा

Pune Breaking News: या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Published on

सागर आव्हाड, पुणे|ता. १८ ऑगस्ट २०२४

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात गाड्यांची तोडफोड, कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. अशातच वाघोली परिसरात टोळक्याने गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime: वाघोली परिसरात गावगुंडांची दहशत! मध्यरात्री गाड्या जाळल्या, कोयते फिरवत वाहनांची तोडफोड; ४ जणांवर गुन्हा
Mumbai News : आधी आईला दारू पाजली, नंतर मुलीवर बलात्कार केला; धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील वाघोली परिसरात दहशत माजवण्यासाठी गाड्यांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दहशत माजवण्याच्या इराद्याने या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून माझ्या नादाला लागू नका म्हणत कोयते भिरकावत परिसरात तोडफोड केली आहे. या प्रकाराने स्थानिक याकडे लक्ष देण्याची मागणी केली असून पोलिसांनी याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Pune Crime: वाघोली परिसरात गावगुंडांची दहशत! मध्यरात्री गाड्या जाळल्या, कोयते फिरवत वाहनांची तोडफोड; ४ जणांवर गुन्हा
Maharashtra Politics : भाजप 400 पार गेला असता तर मोदींनी 3 गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या; 'सामना'तून टीका

दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून या भागात गावगुंडांची दहशत आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. याआधी आमच्या मुलांना मारहाण करण्यात आली, गाड्या जाळल्या मात्र पोलिसांनी लक्ष दिले नाही. काल रात्री आमचे घर, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. उद्या आमच्या मुलांचे काही बरंवाईट झाले तर त्याला लोणीकंद पोलिसच जबाबदार असतील, असे म्हणत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Pune Crime: वाघोली परिसरात गावगुंडांची दहशत! मध्यरात्री गाड्या जाळल्या, कोयते फिरवत वाहनांची तोडफोड; ४ जणांवर गुन्हा
Pune News : आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको; फक्त सातबारा कोरा करा, महिलांची अजित पवारांकडे मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com