Pune News : आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको; फक्त सातबारा कोरा करा, महिलांची अजित पवारांकडे मागणी

mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देऊ नका. फक्त आमचा सातबारा कोरा करा, अशी मागणी महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
mukhyamantri Majhi Ladki Bahin YojanaSaam TV
Published On

आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देऊ नका. फक्त आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेले भामा आसखेड धरण लाभ पुनर्वसनाचे शिक्के काढा तसेच आमचा सातबारा कोरा करा, अशी मागमी खेड तालुक्यातील काळूस गावातील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यासंदर्भात अजित पवार यांना उपोषणकर्त्या महिलांनी निवेदनही दिलं.

mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics : लाडक्या बहिणीवरुन महायुतीत धुसफूस; विधानसभेपूर्वी शिवसेना-राष्ट्रवादीत वाद पेटला

खेड तालुक्यातील (Pune News) अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भामा आसखेड धरण लाभ पुनर्वसनाचा उल्लेख करण्यात आलाय. याविरोधात महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. आमच्या जमिनीवरील बेकायदेशीरपणे टाकलेला पुनर्वसनाचा उल्लेख काढा तसेच आमचा सातबारा कोरा करा, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांची आहे.

दरम्यान, या उपोषणकर्त्या महिलाच्या शिष्टमंडळाने शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. त्यांनी 'जनसन्मान रॅलीत' भेटून अजित पवार यांना राखी बांधली. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, फक्त आमचा सातबारा कोरा करा, अशा आशयाचं निवेदन महिलांनी अजित पवार यांना दिलं.

अजितदादांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. यातूनच महिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सांगलीतील महिलांनी भावा बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट सोन्याची राखी बनवली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ती भेट म्हणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडे सुपूर्द केली आहे. शहरातील महिलांना वर्गणी काढत तीन ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली आहे. ही सोन्याची राखी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला आघाडीकडून रक्षाबंधनाच्या दिवशी अजित पवारांना बांधण्यात येणार आहे.

mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com