Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Saam TV Impact News: अकोल्यात लाडकी बहिणींची लूट करणाऱ्या तलाठी राजेश शेळके यांच्याविरोधात निलंबनाच्या कारवाईनंतर आता थेट एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल
Akola Saam TV Impact NewsSaam Tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही, अकोला प्रतिनिधी

अकोल्यात 'साम'च्या बातमीच्या दणका पहायला मिळाला होता. अकोल्यात लाडकी बहिणींची लूट सुरू असल्याचा प्रकार साम'नं उघडकीस आणला होता. अकोल्यात महिलांकडून तलाठी राजेश शेळके हा उत्पन्नाचा दाखलासाठी लागणारा पटवारी अहवाल देण्यासाठी पैसे घेत असल्याचा विडिओ समोर आला होता. याचीच दखल घेत सरकारनं पैसे घेणाऱ्या तलाठी शेळके याचं तडाफडकी निलंबन केलं होतं. आता सरकार निलंबनाच्या कारवाईवर न थांबता थेट त्याच्यावर अकोल्यातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

मंडळ अधिकारी निखिल साठे यांच्या तक्रारीनंतर राजेश महादेव शेलके (तलाठी) याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले विनामुल्य देण्याचे शासनाचे आदेश असताना शासनाच्या आदेशाची अवहेलना करून स्वताच्या फायद्याकरीता लाभार्थ्याकडून शुल्क स्वरूपात 30 ते 40 रूपये प्रति दाखला, अशी लाचेची मागणी केली होती.

साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल
Third Mumbai : 'तिसरी मुंबई नकोच', काय आहे हा प्रोजेक्ट आणि याला नागरिक का करतायत विरोध? वाचा...

लाच रक्कम स्वीकारून लोकसेवक या नात्याने कार्यालयनी कामकाज करतांना गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले आहे, त्यामुळ शेळके याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सिविल लाईन इथे कलम १९८, ३१८ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ७, १३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाभार्थ्यांची कुठलीही गैरसोय अथवा आर्थिक लूट होऊ नये, असे केल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आलेत, अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

दरम्यान, राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलीये. त्यानंतर राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करत आहेत. यादरम्यान या योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील तलाठी कार्यालयातील हा व्हिडिओ समोर होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाचं महत्वाचा असतो. त्यासाठी मोठी उमरी भागातल्या राजेश शेळके नामक तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचे निदर्शनास आलं होतंय.

साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल
Champai Soren Resigns: झारखंडमध्ये मोठी उलथापालथ! चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा CM

आता अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर ही तलाठी राजेश शेळके यांच्यावर ही निलंबनाची कारवाई झाली होती, विशेष म्हणजे या आधीही तलाठी शेळके यांच्यावर एसीबीनं कारवाई केली होती. आता पुन्हा अकोला एसीबीने शेळके यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com