Pune News: विद्येच्या माहेरघरात चाललंय काय? उच्चशिक्षित तरुणांकडून ड्रग्जची विक्री; तिघांना अटक

Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली आहे.
Pune Crime
Pune CrimeSaam tv
Published On

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात अमली पदार्थ विक्रीप्रकरणी तीन उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली आहे.सिंहगड रस्ता परिसरातून या मुलांना अटक करण्यात आली आहे. (Pune Sinhagad Road News)

Pune Crime
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून पुन्हा हिंदुत्वाचा नारा; महाविकास आघाडीचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

सिंहगड रस्ता परिसरात ही अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमली पदार्थांची विक्री करणारे तरुण उच्चशिक्षित होते. त्यांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलडाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई), पियुष शरद इंगळे (वय २२, रा. चिखली, चिंचवड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

या संशयित आरोपींपैकी अंशुल बी.ए पदवीधर आहे. आर्थ एका विमान कंपनीत नोकरी करत आहे. तर पियुषने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे तिघेजण अमली पदार्थ विकत असल्याचे समोर आले आहेत. ग्रुपमधील काही तरुणांना हे तिघेही अमली पदार्थांची विक्री करत होते. (Pune Crime News)

Pune Crime
Maharashtra Government: 'लाडक्या बहिणीं'च्या साक्षीने होणार नव्या सरकारचा शपथविधी सोहळा, १० हजार महिला लावणार हजेरी

या तिन्ही आरोपींची झडती घेतल्यावर २५१ ग्रॅम ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलिग्रॅम एल.एस. डी अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

सुलतानपूरमध्ये तंबाखूमुळे अपघात

सुलतानपूरमध्ये तंबाखुमुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. त्याचा अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशच्या एका व्यक्तीने तंबाखू थुंकण्यासाठी चालत्या बसचे दार उघडले अन् तो खाली पडला. या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तंबाखू खाणे या व्यक्तीसाठी महागात पडले आहे.

Pune Crime
Accident : तंबाखू थुंकण्यासाठी धावत्या बसचे दार उघडले, बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com