Maharashtra Government: 'लाडक्या बहिणीं'च्या साक्षीने होणार नव्या सरकारचा शपथविधी सोहळा, १० हजार महिला लावणार हजेरी

Swearing In Ceremony Of New Maharashtra CM: महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
Maharashtra Government: 'लाडक्या बहिणीं'च्या साक्षीने होणार नव्या सरकारचा शपथविधी सोहळा,  १० हजार महिला लावणार हजेरी
Ladaki Bahin Yojana Agrowan
Published On

विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर राज्यात लवकरच महायुतीचे सरकार येणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५ डिसेंबर म्हणजे उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे. 'लाडक्या बहिणीं’च्या साक्षीने नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत शेतकरी, साधू महंतांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. यासाठी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी १० हजार महिलांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला लाडकी बहीण योजनेचा खूप चांगला फायदा झाला. लाडक्या बहिणींनी सरकारला चांगली साथ दिली असल्याचे त महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील मेजवानी ठेवण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. यावर पहिल्या रांगेत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असणार आहे. या शपथविधी सोहळ्याला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

तसंच, नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी आणि ४०० साधू महंताना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. नाशिकमधून देखील अनेक साधू महंत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून साधू महंतांना निमंत्रण देण्यात आले आहे. नाशिकमधून महंत सुधिरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराज,महंत भक्तीचरणदास , रामकृष्ण महाराज लहवितकर, संजय धोंगडे , माधवदास राठी यांच्यासह अनेक साधू महंत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या शपथविधी सोहळ्यादरम्यान आझाद मैदानाला छावणीच स्वरूप आले आहे. आझाद मैदानात अडीच हजारहून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. १० पोलिस उपायुक्त, २० सहाय्यक पोलिस आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, १५० सहाय्यक आणि पोलिस उपनिरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलीस दल, जलद कृती दल देखील बंदोबस्तामध्ये तैनात आहेत. शपथविधी सोहळ्यादरम्यान आझाद मैदान नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. ड्रोनच्या सहाय्याने देखील पोलिस लक्ष ठेवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com