Sinhagad Fort Closed: पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?

Sinhagad fort Latet News : आजपासून पुढील दोन दिवस सिंहगड पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?
Sinhagad fort ClosedSaam TV
Published On

तुम्ही जर वीकेंडला सिंहगडावर पर्यटनासाठी जाण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, आजपासून पुढील दोन दिवस सिंहगड पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे सिंहगडावर वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?
Maharashtra Rain Alert : पुण्यासह 'या' जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट; अतिमुसळधार पाऊस कोसळणार

त्यातच हवामान खात्याने (IMD Rain Alert) शनिवारी आणि रविवारी पुण्याला पावसाचा अलर्ट जारी केलाय. हीच बाब लक्षात घेता, सिंहगड आज शनिवार आणि उद्या रविवारी पर्यटनासाठी बंद ठेवला जाईल. त्यामुळे पर्यटकांनी परिसरात फिरण्यासाठी येऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, मंगळवारी सिंहगडावर (Sinhagad Fort) जाणाऱ्या घाट रस्तात डोंगराचा मोठा भाग झाडांसह कोसळून पडला होता. त्यामुळे सिंहगडावर जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. मंगळवारपासूनच दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, जोरदार पावसामुळे कामात मोठे अडथळे येत आहेत.

सिंहगड परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने दरडीतील मातीचा चिखल झाला आहे. चिखल काढण्यास वेळ लागत आहे. त्यातच शुक्रवार आणि शनिवारी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सिंहगड वाहनांना बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?
Jayakwadi Dam Water : खुशखबर! जायकवाडी धरणातील पाणीसाठा तब्बल 5 टक्क्यांनी वाढला; वाचा आजची ताजी आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com