मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये तब्बल 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल्याने सध्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam Water Level) मोठ्या संख्येने पाण्याची आवक होत आहे. गेल्या 24 तासांपासून धरणात 8 हजार 327 क्यूसेक वेगाने पाणी जमा होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आणखीच झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जालना, बीड, तसेच परभणी शहराला पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी धरणसाखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा जायकवाडी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्यास्थितीला जायकवाडी धरणात केवळ 10 टक्के इतका पाणीसाठी उरला आहे.
त्यामुळे भर पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगर शहराला 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. दरम्यान, जून महिन्यात संपूर्ण मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा केवळ 5 टक्क्यांवर आला होता. मात्र, जुलै महिन्यात धरणसाखळी क्षेत्रात काहीसा पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात आता 10 टक्के पाणीसाठा जमा झालाय.
विशेषतः दुष्काळातून बाहेर पडू पाहणाऱ्या मराठवाड्यातील जालना, बीड, संभाजीनगर या जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठवाड्यामध्ये मोठा पाऊस नसला तरी नगर आणि नाशिक जिल्ह्यात पडत असल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान, मराठवाड्यात चांगला पाऊस भरून जायकवाडी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले पाहिजे. तरच यंदाचा पाणीप्रश्न मिटणार अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.