Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून पुन्हा हिंदुत्वाचा नारा; महाविकास आघाडीचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Uddhav Thackeray Latest news : उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्त्वाकडे वळले आहेत...विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिलाय. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत सर्व पदाधिकां-यांसमोर पुन्हा हिंदुत्वावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली. मुंबई महापालिकेसह आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंची काय रणनीती आहे त्यावरचा हा रिपोर्ट
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणूकीत मविआला मतदारांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे सतर्क झाले. एकीकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीत गोंधळ असतांना उद्धव ठाकरे मात्र महापालिका निवडणूकांच्या तयारीला लागले. विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंना कॉग्रेस राष्ट्रवादीपेक्षा चांगले आमदार निवडून आणता असले तरी उद्धव ठाकरे सत्तेपासून फार दुर राहिले. म्हणून उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपल्या शिवसैनिकांना ज्वलंत हिंदुत्त्वाचा मुद्दा लोकापर्यंत पोहचवा असे आदेश मातोश्रीवर झालेल्या बैठकीत दिलेत.

नेमकं काय म्हटले उद्धव ठाकरे ते पाहूयात...

हिंदुत्त्वाचा नारा मुंबई पालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा

हिंदुत्त्वासाठी शिवसेना लढत होती, लढत आहे आणि यापुढेही लढेल

हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार सुरु, त्याला योग्य तो प्रतिवाद करा

निवडणुकीसाठी कामाला लागा, मुंबई महापालिका आपल्याला जिंकायची आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : ...तोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहावेत, आमदारांची मागणी, शिवसेना नेत्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंनी मविआसोबत जाऊन हिंदुत्व सोडलं या नरेटिव्हचा शिंदेगटाला आणि भाजपला विधानसभा निवडणूकीत फायदा झाल्याचं दिसलं. तर विधानसभा निवडणूकीत अल्पसंख्याक मतदारांनी देखिल महायुतीला पसंती दिल्याचं दिसलं. तसंच नगरसेवकांनी देखिल आपण हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भुमिका स्पष्ट करण्याची मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जाज्वल्य हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत महापालिका लढवण्याची घोषणा केलीये.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: महायुतीत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त, छगन भुजबळांचं मोठं विधान
Uddhav Thackeray
Eknath Shinde Health Update : एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली; ताप, अशक्तपणा, सलाईन लावले

उद्धव ठाकरेंची शिवसेना आधीही हिंदुत्वासाठी लढत होती उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असल्याची गर्जना करत आपली हिंदुत्त्वाची भूमिका लोकापर्यंत पोहचवण्याचं शिवसैनिकांना आवाहन केलंय. त्यामुळे आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मविआतून उद्धव ठाकरे एकला चलो रे ची भूमिका घेतात का हे पाहणं देखिल महत्वाचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com