KDMC News: अनधिकृत बांधकामावर केडीएमसीची ॲक्शन; निर्माणातील इमारतीवर तोडक कारवाई

KDMC Demolition of Building: केडीएमसी अनधिकृत बांधकामांबाबत ॲक्शन मोडवर आली आहे. केडीएमसीचे आयुक्त इंदू राणी जाखड यांनी सहाय्यक आयुक्तांच्या बैठका घेत बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
KDMC News
KDMC Demolition of Buildingsaam Tv
Published On

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

अनधिकृत बांधकामांबाबत केडीएमसी अॅक्शन मोडवर आलीय. एका उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बांधण्यात येणाऱ्या इमारतीवर केडीएमसीवर करवाई केलीय. 65 बेकायदा इमारत प्रकरणानंतर केडीएमसी अनधिकृत बांधकामांबाबत ॲक्शन मोडवर आली आहे. केडीएमसीचे आयुक्त इंदू राणी जाखड यांनी सहाय्यक आयुक्तांच्या बैठका घेत बांधकामाविरोधात कारवाई करण्याबाबत सक्त ताकीद दिली.

या पार्श्वभूमीवर बेकायदा 65 इमारतींच्या सर्व्हे दरम्यान डोंबिवली जवळील खंबाळपाडा कांचनगाव येथे एका उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे अधिकारांच्या निदर्शनास आले. तात्काळ या इमारतीची माहिती तपासली असता ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती मिळाली.

KDMC News
State Government: सरकारकडे काम आहे व्हॉट्सअ‍ॅप करा! Whats App वर मिळणार सरकारच्या ५०० सेवांचा लाभ

या इमारतीचा बिल्डर चेतन माळी विरोधात केडीएमसीकडून एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आज पोलीस बंदोबस्तात, पोकलेन ,जेसीबीच्या सहाय्याने ही इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हा इमारतीवर हातोडा मारत कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसात ही इमारत पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात येईल व हा आरक्षित भूखंड मोकळा करण्यात येईल, असं सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले.

डोबिंवलीनंतर कल्याणमध्ये पुन्हा एक बेकायदेशीर इमारत प्रकरण उघड

महापालिकेने कल्याणमध्ये आणखी एका अनधिकृत इमारतीवर कारवाई केली आहे. कारवाईपूर्वी इमारत बेकायदेशीर असल्याची कल्पना रहिवाशांना नव्हती. कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरातील वक्रतुंड या इमारतीवर कारवाई केली आहे. कारवाई होण्यापूर्वी ही इमारत अनधिकृत आहे याची माहिती तेथील रहिवाशांना नव्हती. या कारवाईमुळे २६ कुटुंबांच्या संसार रस्त्यावर आलीत.

दोषींच्या मालमत्ता जप्त करा, रहिवाशांना भरपाई द्या

डोंबिवलीतील ६५ इमारती बेकायदेशीर ठरवण्यात आल्याने ६५०० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आलीय. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कल्याण डोंबिवली मधील ६५ इमारतींवर कारवाई होणार असल्याची माहिती केडीएमसी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली. मात्र या इमारतींमधील नागरिकांनी घर घेण्यासाठी आयुष्यभराची पुंजी गुंतवलीय. अनेकांनी घरांसाठी बँकांकडून कर्ज काढले आहे. तर काहींना पीएमआवासचे पैसे आलेत. हे सर्व गोष्टी झाल्यानंतरही या इमारती अनधिकृत कशा असा सवाल येथील नागरिकांना केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com