Sudha Murthy  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sudha Murthy : सुधा मूर्ती यांच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO

Sudha Murthy-Javed Akhtar Meet : ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं या व्हिडीओमध्ये काय आहे, जाणून घ्या.

Shreya Maskar

ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) या कायमच आपल्या लेखनाने सर्वांना प्रोत्साहन देत असतात. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहे. कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्या चर्चेत असतात. साधे राहणीमान आणि उच्च विचार यासाठी सुधा मूर्ती ओळखल्या जातात. सुधा मूर्ती यांनी अलिकडेच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आपली उपस्थिती लावली. या फेस्टिव्हलचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी सुधा मूर्ती आणि जावेद अख्तर यांची भेट झाली आणि छोटा संवाद घडला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुधा मूर्ती जावेद अख्तर यांच्या पाया पडताना पाहायला मिळत आहे. सुधा मूर्ती यांनी पाया पडून जावेद अख्तर यांचे आशीर्वाद घेतले आहे.

सुधा मूर्ती यांच्या या कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. सुधा मूर्ती या एक व्यावसायिक देखील आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुधा मूर्तींची पुस्तके प्रेरणा देणार आणि हरवलेले व्यक्तीला वाट दाखवणारी आहे.

सुधा मूर्ती जावेद अख्तर यांच्या पाया पडताना जावेद अख्तर यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. सुधा मूर्ती यांचा साधेपणाचे नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करतो. जावेद अख्तर यांनी या 'जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल'मध्ये जाऊन "ज्ञान सीपियाँ:पर्ल्स ऑफ विजडम" हे नवीन पुस्तक प्रकाशित केले. या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी शिक्षण, भाषा आणि सांस्कृतिकवर आपले मते मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या ताटातील मासे गायब होणार? समुद्राचं पाणी होतंय विषारी

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी घरगुती हे सीरम करा ट्राय, आठवड्याभरात दिसेल फरक

गृहयुद्धामुळे हाहाकार, रुग्णालयात एअर स्ट्राईक 30 जणांचा मृत्यू, 70 जखमी

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT