Palghar Train accident : भीषण! मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या जयपूर एक्स्प्रेसने तिघांना चिरडलं

Palghar Train accident update : पालघरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या जयपूर एक्स्प्रेसच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Palghar
Palghar Train accident :Saam tv
Published On

पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव जयपूर एक्स्प्रेसने तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. पालघरच्या हनुमान मंदिर चौक येथील बंद फाटकाजवळ ही अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.

Palghar
Crime News : नवी मुंबईत १५ बांगलादेशी ताब्यात; धुळ्यातील महामार्गावर लूटमारीचा उलगडा, चोरट्याला ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला. पालघर रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिर चौक येथील बंद फाटकाजवळ भरधाव ट्रेनने तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. ट्रेनच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच आरपीएफ आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. जखमीवर पालघर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Palghar
Jalgaon Crime: पोटच्या मुलीसोबत आईने उचललं टोकाचं पाऊल, घरात आढळले मृतदेह; नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव जयपूर एक्स्प्रेसने पालघरजवळ तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर हनुमान मंदिर चौक परिसरात असलेल्या बंद रेल्वे फाटकाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Palghar
Palghar Crime: पालघर हादरले! घरी सोडतो सांगत जंगलात नेले, तरुणीसोबत भयंकर घडलं

या अपघातामधील जखमीवर पालघरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रेल्वे रुळ ओलांलडताना करताना अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे. अपघातानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com