Gangappa Pujari
ज्येष्ठ लेखिका, इन्फोसिस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे.
सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांचं अभिंदन केले आहे.
सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत.
तसेच त्या एक यशस्वी उद्योजिका, लेखिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
सुधा मूर्ती यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत. अक्षता नारायण मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत.
तसेच त्यांचे पुत्र रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत.
विशेष म्हणजे भारतातील सर्वात मोठी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग कंपनी असलेल्या टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंता आहेत.