Udit Narayan : बाई काय हा प्रकार! उदित नारायण यांनी चक्क लाइव्ह शोमध्ये फॅनला केलं लिप किस, पाहा VIDEO

Udit Narayan Viral Video : गायक उदित नारायण यांनी लाइव्ह शोमध्ये फॅनला लिप किस केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडले, जाणून घ्या.
Udit Narayan Viral Video
Udit Narayan SAAM TV
Published On

बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) नेहमी त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यांच्या मधुर आवाजाचे चाहते दिवाने आहेत. आता मात्र उदित नारायण एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक लाइव्ह शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण शोमध्ये गाणी गात चाहत्यांना भेटताना पाहायला मिळत आहे.

उदित नारायण यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ते एका महिला चाहतीला लिप किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेवेळी उदित नारायण 'टिप टिप बरसा पानी' हे गाणे गात होते. तेव्हा त्यांनी स्टोजवरूनच चाहत्यांशी भेट घेतली. यात अनेक महिला चाहत्यांनी उदित नारायण यांच्यासोबत फोटो काढले. तेव्हा अनेक महिला चाहत्यांना उदित नारायण यांनी किस केले. मात्र एका चाहतीला लिप किस केल्यामुळे आता उदित नारायण हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

उदित नारायण यांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. उदित नारायण यांनी ट्रोल करण्यात येत आहे. मात्र यावर अद्यापही उदित नारायण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कोण म्हणत की, "घटस्फोटाची बातमी लवकरच येईल", तर दुसरा युजर्स म्हणतो की, "आदित्य तुझ्या वडिलांना सांभाळ" तर इतर नेटकरी म्हणाले की, गाण्यासोबत वाहून गेले, ठरकी अशा कमेंट्स आल्या आहेत. उदित नारायण यांच्या गाण्यांची आजही भन्नाट क्रेझ पाहायला मिळते.

उदित नारायण यांनी आजवर हिंदी, तमिळ, बंगाली, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम केले आहे. त्यांचे अनेक अल्बमही गाजलेले आहे. उदित नारायण यांचे 'पापा कहता है बडा नाम करेगा' हे गाणे खूप जास्त लोकप्रिय झाले. या गाण्यामुळे खऱ्या अर्थाने उदित नारायण यांच्या करिअरला सुरूवात झाली. उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण देखील प्रसिद्ध गायक आहे. त्याने देखील आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. अनेक वेळा हे बाप-लेक एकत्र गाणी गाताना कार्यक्रमात पाहायला मिळतात.

Udit Narayan Viral Video
HBD Jackie Shroff : एकेकाळी शेंगदाणे विकणारा जग्गू दादा आता कोट्यवधींचा मालक, जॅकी श्रॉफ यांचा संघर्षमय प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com