Disha Patani Birthday : दिशा पाटनीला अभिनय नव्हे तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; खिशात ५०० रुपये घेऊन गाठली होती मुंबई, जाणून घ्या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी
Disha Patani Struggle Story Instagram/@dishapatani
मनोरंजन बातम्या

Disha Patani Birthday : दिशा पाटनीला अभिनय नव्हे तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; खिशात ५०० रुपये घेऊन गाठली होती मुंबई, जाणून घ्या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी

Chetan Bodke

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी २' यांसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली तरी तिने केव्हाच अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता. दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९२ रोजी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये झाला आहे. दिशाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. खरंतर तिने केव्हाच फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणतीच ओळख नसताना तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची छाप पाडली आहे.

अभिनेत्रीला बालपणापासून अभिनेत्री नाही तर, शास्त्रज्ञ व्हायचं होतं. तिने तिचं शिक्षण लखनऊच्या अमेठी युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना, तिने मॉडेलिंगमधून आपल्या करियरची सुरुवात केली. वयाच्य १७ व्या वर्षापासून दिशाने मॉडेलिंग करायला सुरूवात केली होती. २०१५ मध्ये दिशाने जाहिरात केली आणि तेव्हापासून तिच्या फिल्मी करियरची सुरुवात झाली. तिचा पहिला 'लोफर' हा तेलुगू चित्रपट होता. या पहिल्या चित्रपटातून दिशाला प्रेक्षकांची विशेष पसंदी मिळाली.

जेव्हा दिशा उत्तर प्रदेशातून भारतात आली त्यावेळी ती फक्त ५०० रुपये घेऊन आली होती. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, "अर्ध्यात मी शिक्षण सोडून मी मुंबईमध्ये आली. एका अनोळख्या ठिकाणी येऊन राहणं काही सोप्पी गोष्ट नाही. मी केव्हाच घरच्यांकडे स्वत:च्या खर्चासाठी पैसे मागितले नाहीत. माझ्यावर अनेकदा अशी वेळ आली होती, माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मी जाहिरात आणि चित्रपटाच्या ऑडिशन्ससाठी मी खूप फिरले. काम मिळालं नाही तर, घरभाडं कसं देऊ हा विचार माझ्या अनेकदा यायचा. मला एका चित्रपटामध्ये संधी मिळाली. पण ऐनवेळी दुसऱ्याच अभिनेत्रीला घेतलं."

"हा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा माझा तो पहिलाच चित्रपट होता. पण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतंच. मिळालेल्या नकाराने मला खूप खंबीर बनवले. प्रत्येक नकारातून मी खूप शिकले. ज्यासाठी आपल्याला नकार मिळतो त्यावेळी तुम्ही त्यासाठी प्रचंड मेहनत घेतात." मग पुढे एका चॉकलेटच्या जाहिरातीतून दिशा झळकली. त्यानंतर अत्यंत कमी वेळात दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. 'एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून तिने पदार्पण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rrichest Thief: अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!

Special Report : खेळाडूंना 11 कोटी, शेतकऱ्यांना काय? क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची उधळण; वडेट्टीवार, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Assembly Bypoll 2024: पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी! 7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक, काय आहे राजकीय समीकरण?

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT