Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी

Rahul Gandhi Amethi Raebareli Seat: राहुल गांधींच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र राहुल गांधी यांचा हा निर्णय म्हणजे त्यांच्या राजकीय रणनितीचा भाग असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत.
Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी
Rahul Gandhi Amethi Raebareli Seat:Saam TV

दिल्ली|ता. ३ मे २०२४

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेठीतून लोकसभा न लढवता वायनाड आणि रायबरेली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे अमेठी हा काँग्रेस आणि गांधी परिवाराचा गेल्या पाच दशकांपासून परंपरागत मतदार संघ मानला जातो. काँग्रेस नेते संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.

त्यामुळे राहुल गांधींच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र राहुल गांधी यांचा हा निर्णय म्हणजे त्यांच्या राजकीय रणनितीचा भाग असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत. नेमकं काय आहे यामागचं कारण? वाचा सविस्तर.

राहुल गांधींनी का सोडली अमेठी?

अमेठीची जागा सोडून रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा राहुल गांधींचा निर्णय म्हणजे राजकीय रणनितीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. 2024 च्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे मोदी विरुद्ध राहुल यांच्याभोवती फिरत आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली असती तर राहुल विरुद्ध स्मृती इराणी असे चित्र दिसले असते. त्यामुळेच असे वातावरण तयार होऊ नये म्हणून राहुल गांधींनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

पराभवाची भिती की रणनिती?

यामागचे दुसरे कारण म्हणजे, राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवली असती तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी द्यावी लागली असती. प्रियांका गांधी यांना लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नव्हता. प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर भाजपला घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्याची आयती संधी मिळाली असती.

महत्वाचे म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनीही निवडणूक लढवली असती तर त्यांना त्यांच्याच मतदार संघात लक्ष द्यावे लागले असते. त्यामुळे इतर राज्यातील प्रचारावर परिणाम झाला असता. हे सुद्धा यामागचे कारण असल्याची चर्चा आहे.

Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी
Sanjay Raut: विश्वजित कदम वाघ आहेत की नाही, 4 जूनला कळेल : संजय राऊत, Video

स्मृती इराणींचा धसका?

स्मृती इराणी पुन्हा एकदा भाजपच्या तिकीटावर अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून त्या अमेठीत तळ ठोकून आहेत. जर राहुल गांधी अमेठीतून स्मृती इराणींच्या विरोधात लढले असते आणि पुन्हा निवडणूक हरले असते, तर काँग्रेस तसेच गांधी घराण्याबाबत राजकीयदृष्ट्या चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे उत्तर भारतीय राजकारणात राहुल यांच्यासाठी राजकीय वाटचाल खूपच अवघड झाली असती. ही कोंडी टाळण्यासाठी अमेठीऐवजी रायबरेलीची जागा निवडण्यात आल्याचे मानले जात आहे.

Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी
Yawal Fire News : प्राचीन श्रीराम मंदिरासह बँकेला आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com