Sanjay Raut: विश्वजित कदम वाघ आहेत की नाही, 4 जूनला कळेल : संजय राऊत, Video

माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी पंतप्रधान माेदी, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. तसेच राऊत यांचा विश्वजीत कदम यांच्यावर देखील काही प्रमाणात राेष असल्याचे दिसून आले.
sanjay raut challenges vishwajeet kadam sangli lok sabha election
sanjay raut challenges vishwajeet kadam sangli lok sabha election Saam Digital
Published On

Sangli Lok Sabha Election :

सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत करण्याचे काही जणांचे डावपेच आहेत. विशाल पाटील (vishal patil) यांना भाजपच रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप करत विश्वजीत कदम (vishwajeet kadam) हे वाघ आहेत की नाहीत हे चार जूनलाच कळेल अशी टिप्पणी खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी येथे आज (शुक्रवार) माध्यमांशी बाेलताना केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (chandrahar patil) यांच्या प्रचारासाठी सांगलीत आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी पंतप्रधान माेदी, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. तसेच राऊत यांचा विश्वजीत कदम यांच्यावर देखील काही प्रमाणात राेष असल्याचे दिसून आले.

sanjay raut challenges vishwajeet kadam sangli lok sabha election
Vinayak Raut: भूमाफियांसाठी शिंदे-फडणवीसांनी आखला मोठा डाव: विनायक राऊतांनी जीआर सांगितला

खासदार संजय राऊत यांना विश्वजीत कदम यांच्या सांगलीत मी वाघ असल्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगलीचा एकमेव वाघ हे वसंतदादा पाटीलच होते असे म्हटलं. वाघ काय असताे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे आम्ही पाहिले आहेत. वाघाची रचना त्याचा स्वभाव वेगळा असताे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

4 जून नंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू : संजय राऊत

संजय राऊत पुढं बाेलताना म्हणाले विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. स्वतःला वाघ सिद्ध करायचे असेल तर चंद्रहार पाटील यांना विजयी केले पाहिजे. 4 जून नंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू असेही राऊत यांनी विश्वजीत कदम यांच्याविषयी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

sanjay raut challenges vishwajeet kadam sangli lok sabha election
Bhiwandi Constituency: भिवंडी मतदारसंघात राजकारण तापलं, काॅंग्रेस नेते दयानंद चोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com