Sharad Pawar: म्हणून उत्तर प्रदेश पुढे गेला आणि महाराष्ट्र मागे राहिला, साखर उत्पादनावरून शरद पवारांनी राज्य सरकारला सुनावलं

Sharad Pawar On Sugar Production: साखर उत्पादनात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे सोडलं आहे. यावरून आता शरद पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
म्हणून उत्तर प्रदेश पुढे गेला आणि महाराष्ट्र मागे राहिला, साखर उत्पादनावरून शरद पवारांनी राज्य सरकारला सुनावलं
Sharad Pawar On Sugar ProductionSaam Tv

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

''आज आनंदाचा दिवस आहे. दुष्काळी दौऱ्यसाठी मी जेव्हा निघतो, तेव्हा पावसाची सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगले वर्ष आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील'', असं शरद पवार म्हणाले आहेत. बारामती येथे आयोजित व्यापारी मेळाव्यात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

...म्हणून उत्तर प्रदेश साखर उत्पादन दोन नंबरला गेला

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की, ''यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादन दोन नंबरला गेला. राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही. महाराष्ट्रामध्ये साखरेचे उत्पादन जास्त झालं. केंद्र सरकारने निर्बंध आणले. त्यांना मी सांगितले होते, निर्बंध आणू नका. त्यांनी मला सांगितले की, निवडणूक होईलपर्यत आम्ही तुमचे ऐकणार नाही.'' ते म्हणाले की, ''केंद्र सरकारने यंदा इथेनॉलला बंदी घातली. त्यामुळे कारखानदारांचे नुकसान झाले. अपेक्षा अशी आहे की, हे चित्र आता बदलेल.

म्हणून उत्तर प्रदेश पुढे गेला आणि महाराष्ट्र मागे राहिला, साखर उत्पादनावरून शरद पवारांनी राज्य सरकारला सुनावलं
Who is Mohan Charan Majhi: 4 वेळा आमदार, कणखर व खंबीर आदिवासी नेतृत्व; कोण आहेत ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी?

लोकसभा निवडणुकीवर भाष्य करत शरद पवार म्हणाले, ''लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामधील लोकांचे आभार मानले पाहिजे. गेली 10 वर्ष मोदी शहा यांची सत्ता होती. निकाल वेगळा दिसला. या देशात स्थिरता येईल, अशी अपेक्षा आहे. देशाच्या अर्थ व्यवस्था मजबूत आणि स्थिर कशी राहील याचा विचार केला पाहिजे.''

भाजपला लक्ष्य करत ते म्हणाले, ''आज सत्तेत आले आहेत, त्यांना 300 हून जास्त जागा निवडून दिल्या होत्या. आता त्या 240 झाल्या. त्यांच्या 60 जागा कमी झाल्या आहेत. राम मंदिर हा प्रचाराचा मुद्दा असेल मला वाटायचं. राम मंदिराचा मुद्दे घेत सत्ताधारी पक्षाला मतदान जाईल, असं वाटलं. जिथं मंदिर बांधले तिथे भाजपचा पराभव झाला.''

म्हणून उत्तर प्रदेश पुढे गेला आणि महाराष्ट्र मागे राहिला, साखर उत्पादनावरून शरद पवारांनी राज्य सरकारला सुनावलं
Ashadhi Ekadashi : आनंदाची बातमी! आषाढी यात्रेसाठी एसटी 5 हजार विशेष बसेस सोडणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

शरद पवार पुढे म्हणाले की, मोदींना सरकार बनवताना बाकीच्यांची मदत घ्यावी लागली. जेव्हा दुसऱ्याची मदत घ्यावी लागते तेव्हा, सरकार स्थिर असावे, अशी अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com