Devendra Fadnavis: राजीनामा म्हणजे वेदनादायी गोष्ट; देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ पुणे भाजप एकवटलं, कार्यकर्त्यांचं उपोषण

Devendra Fadnavis Supporters Hunger Strike In Mulshi: देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ पुणे भाजप एकवटल्याचं दिसत आहे. फडणवीसांनी राजीनामा देऊ नये म्हणून मुळशीत कार्यकर्ते उपोषण करत आहेत.
देवेंद्र फडणवीस
Devendra FadnavisSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीला लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही, याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे आता पुणे भाजप देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत.

मुळशीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) समर्थनार्थ कार्यकर्ते उपोषण करीत आहेत. फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, म्हणून कार्यकर्ते एकवटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात पुणे जिल्ह्यात कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणी मुळशीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सागर सोपानराव मारणे नावाचे कार्यकर्ते एक दिवसीय लक्षणीय उपोषण करीत आहेत.

फडणवीसांनी राजीनामा देऊ नये म्हणून, मुळशीत (Mulshi) कार्यकर्ते थेट उपोषणाला बसले (Maharashtra Politics) आहेत. यावेळी कार्यकर्ते अतिशय भावनिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद आहेत. त्यांचा राजीनामा म्हणजे वेदनादायी गोष्ट असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीतील राज्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी फडणवीस यांनी स्वीकारली आहे. त्यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती केलेली आहे.

देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Resign: तुमचे काम सुरू ठेवा, अमित शहांचा फडणवीसांना राजीनामा न देण्याचा सल्ला-सूत्र

देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याचं दिसत (Pune News) आहे. त्यामुळे राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करायचंय. त्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मूक्त करून पक्षात पूर्णवेळ काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली होती. त्यानंतर कार्यकर्ते त्यांची समजूत काढताना देखील पाहायला मिळालं होतं, आता तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवू नये म्हणून समर्थकांनी थेट उपोषणाचं हत्यार उचललं (Devendra Fadnavis Supporters) आहे.

देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : 'मी पळून जाणारा नाही' : जबाबदारीतून मुक्त करण्याच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com