Devendra Fadnavis : 'मी पळून जाणारा नाही' : जबाबदारीतून मुक्त करण्याच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics 2024 : लोकसभा निवडणुकीती अपयशाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीतून मुक्त केलं होतं. त्यावर आज त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Digital
Published On

लोसकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून येण्याचा विश्वास असलेल्या भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं. त्याची सर्व जबाबदारीतून स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांची ही विनंती काल दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शहांनी मान्य केली नाही. त्यानंंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस हा माणूस कधीही पळून जाणारा नाही, पराभवही अंगावर घेणारा असल्याचं म्हटलं आहे.

आज भाजपच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांची बैठक झाली. यावेळी त्यांनी पक्षांची पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत आभार मानले. तसंच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना एनडीएचं समर्थन मिळाल्यामुळे फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आलेल्या लोकसभेच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. गेले ३ दिवस पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवस संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी मनधरणी केली मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. शुक्रवारी दिल्लीत अमित शहांची त्यांनी भेट घेतली होती.

दरम्यान आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपयश का आलं. यावर भाष्य केलं. विरोधकांनी भाजपने संविधान बदलण्यासाठीचं ४०० पारच्या जागांचा नारा दिला आहे. असा चुकीचा प्रचार विरोधकांनी केला. त्याचा अल्पसंख्याक आणि मागास समजाज्या मतांवर परिणाम झाला. मराठा समाजामध्ये चुकीचा संभ्रम निर्माण केला. ज्यांनी मराठा आरक्षण दिलं, सारथीसारखी संस्था उभी केली आणि ज्यांनी १९८० पासून मराठा सामाजाला विरोध केला त्यांना मतं देण्यात आली. मात्र विरोधक मराठा समाजाची मतं मिळवण्यात काही प्रमाणात यशस्वी, झाल्यांचं फडणवीसांनी मान्य केलं.

Devendra Fadnavis
NDA Cabinet Ministers: ब्रेकिंग! प्रफुल पटेलांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; उद्या घेणार शपथ

आपल्यावर लोकसभा निवडणुकांंची जबाबदारी होती. राज्यात भाजपच्या महायुतीच्या जागा कमी निवडून आल्या. त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. मात्र मी देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती पळून जाणारी नाही. आम्ही पराभवही अंगावर घेतो. ती ताकद असावी लागते. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं. मात्र प्रवक्यांनी जरा समजून बोलालं, असं म्हणत त्यांनी पक्षातील काही नेत्यांचे कानही टोचले आहेत.

Devendra Fadnavis
Jayant Patil : जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचा मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com