जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचा मोठा दावा
jayant Patil : Saam tv

Jayant Patil : जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचा मोठा दावा

Dharmarao atram on Jayant Patil : राज्य सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करतील असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.
Published on

मंगेश भांडेकर, साम टीव्ही प्रतिनिधी

गडचिरोली : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. या निवडणुकीत शरद पवार गटाने १० पैकी ८ जागा जिंकल्या. तर अजित पवार गटाने ४ पैकी १ जागा जिंकली. या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता २-३ महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्व राजकीय पक्षांना आतापासूनविधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीचं वातावरण निर्माण होण्याआधीच राज्य सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा दावा केलाय. जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहे, असा दावा मंत्री आत्राम यांनी केला आहे.

राज्य सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठं भाष्य केलं आहे. मंत्री आत्राम यांनी जयंत पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करतील, असा पुन्हा एकदा दावा केला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला. लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात निष्ठा बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीनंतर राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे.

जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचा मोठा दावा
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे २ खासदार आमच्या संपर्कात, मोदींना पाठिंबा द्यायला तयार; खासदार नरेश म्हस्के यांचा मोठा दावा

लोकसभा निवणुकीतील पराभवानंतर बोलावलेल्या बैठकीत धर्मरावबाबा आत्राम सहभागी झाले नव्हते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. स्वत: धर्मरावबाबा आत्राम यांनी मी अजित पवार यांच्यासोबत राहणार असून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत आमच्या गटात येतील, असं विधान आत्राम यांनी केलं. दिल्लीत मजबूत सरकार स्थापनेनंतर लवकरच हे घडून येईल, असेही आत्राम पुढे म्हणाले.

जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचा मोठा दावा
Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण? प्रशांत किशोर यांनी दिलं उत्तर

आमदार प्रकाश सुर्वेंनी तो दावा खोडून काढला

लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतर शिंदे गटातील ६ आमदार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. 'शिंदे गटातील एकही आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार नाही, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दावा खोडून काढला. ठाकरे गटात प्रवेश करु इच्छिणाऱ्या एकही आमदाराचं नाव सांगितल्यास त्याला रोख पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचेही सुर्वे यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com