Maharashtra Politics : ठाकरे गटाचे २ खासदार आमच्या संपर्कात, मोदींना पाठिंबा द्यायला तयार; खासदार नरेश म्हस्के यांचा मोठा दावा

naresh mhaske News :ठाकरे गटाचे खासदार आमच्या संपर्कत आहेत, असा मोठा दावा शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ठाकरे गटाचे २ खासदार आमच्या संपर्कात; खासदार नरेश म्हस्के यांचा दावा
Maharashtra Politics Saam tv
Published On

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या. त्यानंतर भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या आधारावर सत्तास्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच सामोरे गेलेल्या शिंदे गटाचे ७ उमेदवार जिंकले. तर ठाकरे गटाचे ९ उमेदवार जिंकले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे गटाचे २ खासदार आमच्या संपर्कात; खासदार नरेश म्हस्के यांचा दावा
India PM Oath Ceremony: नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; निमंत्रण पत्रिका आली समोर

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. नरेश म्हस्के यांनी म्हटलं की, ठाकरे गटाचे २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपात्रतेचा विषय असल्यामुळे ते थांबले आहेत. मात्र, ६ लोक लोक जमवून आमच्यासोबत येणार आहेत. दिल्लीत हे काल रात्री घडलं. विकासकामे व्हावीत, यासाठी ते यायला तयार आहेत. शिवसेनेच्या तत्वांसाठी आमच्यासोबत यायला तयार आहेत. आम्हाला दबाव टाकण्याची गरज नाही'.

ठाकरे गटाचे २ खासदार आमच्या संपर्कात; खासदार नरेश म्हस्के यांचा दावा
CM Eknath Shinde : मंत्रिपदाचा निर्णय खासदारांच्या मेरिटनुसार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

'आगामी निवडणुकीत सर्व परिणाम दिसतील. मतदार आमच्यासोबत नसते तर आम्ही एवढ्या मतांनी निवडून आलो असतो का? असा सवाल म्हस्के यांनी केला. खासदार राजीनामा देऊन सोबत येणार का, म्हस्के म्हणाले, 'पुढे काय आहे ते कळेल. सगळंच आज कसं सांगणार'.

मतदार दूर झाल्याच्या दाव्यावर बोलताना म्हस्के म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदीनिवडी झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून ठाकरे गट, शरद पवार गटाचे नेते पे रोलवरील व्यक्ती खोट्या गोष्टी माध्यमांसमोर सांगत आहेत. ठाकरे गटाचा मूळ मतदार त्यांच्यापासून दूर गेला आहे. काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन लाखो रुपये वाटून एक तेढ निर्माम करण्याचा प्रयत्न करत पदरात पाडून घेतली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com