Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत त्याच्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याच्या अचानक एक्झिटने अवघी चित्रपटसृष्टी हळहळली होती. एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नेहमीच सुशांत सिंह चाहत्यांच्या स्मरणात राहिल. जरीही सुशांत आज आपल्यात नसला तरी, त्याच्या आठवणी कायमच सर्वांसोबत आहेत. त्याचे काही चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.
सुशांतसिंह राजपूतने टेलिव्हिजनमधील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक भूमिकेने केली होती. सुशांतने 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत प्रकाश झोतात आला. 'जरा नच के देखा' आणि 'झलक दिखला जा' यासारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये आपली झलक दाखवत स्थान निर्माण केले. त्याच्या वाढदिवसानिमित्त, सुशांत सिंग राजपूतच्या काही चित्रपटांमध्येच काम केले आहे. चला तर जाणून घेऊया, त्याच्या उत्कृष्ट भूमिका.
काय पो चे
अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काई पो चे' हा सुशांतचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात सुशांतने एका अपयशी क्रिकेटरच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. त्याने आपल्या अप्रतिम भूमिकेने चाहत्यांची मन जिंकले.
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या बायोपिकमध्ये त्याने उत्कृष्ट भूमिका साकरली होती. माजी भारतीय क्रिकेट कर्णधार धोनीची भूमिका साकारली होती. सुशांत सिंग राजपूतने धोनीच्या कारकिर्दीतील आणि वैयक्तिक जीवनातील मुख्य क्षण त्यात चित्रित करण्यात आले आहे, त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
छिछोरे
सुशांत सिंग राजपूतने अनिरुद्ध पाठकची भूमिका साकारली होती, जो आपल्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर घडलेल्या काही गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करतो. हा चित्रपट एक कॉमेडी-ड्रामा असून यामध्ये तरुणांना मिळालेल्या अपयशावर ठोस पाऊल उचलले आहे.
दिल बेचारा
सुशांत सिंग राजपूतचा हा अखेरचा चित्रपट ठरला. त्याने कॅन्सर सपोर्ट ग्रुपला सपोर्ट करणाऱ्या किझीच्या आयुष्यात आनंद आणि उबदारपणा आणणाऱ्या कॅन्सर पेशंट मॅनीची भूमिका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.