
Sushant Singh Rajput: फार कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान अढळ निर्माण करणारी कलाकार मंडळी क्वचितच आहेत. त्यातील एक कलाकार म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांतने काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. सुशांत सिंहचा आज वाढदिवस असला तरी कुटुंबीय आणि चाहत्यांचे डोळे पाणावणारा हा दिवस आहे. सुशांत हयात नसला तरी त्याच्या आठवणी आणि व्हिडिओ चाहत्यांच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर केले जात आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना त्याने इंडस्ट्रीत आपले स्थान अढळ निर्माण केले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. अभिनेत्याच्या निधनाला जवळपास 3 वर्षे होत असताना अद्यापही त्याच्या मृत्यूबाबत काही प्रश्न अनुत्तरित आहेत, असे चाहत्यांना वाटते.
सुशांतच्या फॅन पेज अकाऊंटवरून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून चाहते सुन्न झाले असून अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.
या व्हिडिओत, सुशांतची अवस्था फारच वाईट दिसून येत आहे. त्यात तो फारच आजारी दिसत आहे. या व्हिडिओत रियाही असून सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशीचा असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी रियावर बरेच भडकले आहेत.
सुशांतचा मृत्यू १४ जून २०२० मध्ये झाला होता. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याच्या अचानक एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला होता. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. सोबतच एक मोठं ड्रग्स कनेक्शनही समोर आलं होतं. तिच्यावर गंभीर आरोप देखील लावण्यात आले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.