Sushant Singh Rajput Birthday: सुशांतला कशी मिळाली पहिली भूमिका, एका अॅक्शनने जिंकले निर्मात्यांचे मन...

'पवित्र रिश्ता' या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतला त्याच्या करिअरमध्ये प्रसिद्धी मिळाली.
Sushant Singh Rajput
Sushant Singh RajputSaam Tv

Sushant Singh Rajput First Role: बॉलिवूडचा सुपरस्टार सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाही पण चाहत्यांच्या आठवणींमध्ये तो आजही जिवंत आहेत. सुशांतचे चाहते त्याला विसरू शकलेले नाहीत. 21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेल्या सुशांत सिंह राजपूतचा आज 37वा वाढदिवस आहे.

'पवित्र रिश्ता' या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतला त्याच्या करिअरमध्ये प्रसिद्धी मिळाली. या मालिकेने त्याला घराघरात ओळख मिळवून दिली. सुशांत प्रत्येक घराचा लाडका झाला. पण सुशांतला ही भूमिका सहज मिळाली नाही. जेव्हा सुशांतला या मालिकेत काम करण्याची ऑफर आली, तेव्हा तो आधी एका मालिकेत काम करत होता.

खरंतर एकतानेच याबाबत एकदा सांगितलं होतं. एकताच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सुशांत पवित्र रिश्तासाठी कास्ट होणार होता, त्यावेळी तो 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेत दुसऱ्या लीडची भूमिका करत होता. त्या मालिकेत सुशांत कंत्राटी तत्वावर होता. अशा परिस्थितीत ही मालिका करत असताना त्याला इतर मालिकांमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. ते नियमांच्या विरोधात होते.

Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput Birthday: 'पी के'मधील भूमिकेसाठी सुशांतने घेतले होते फक्त २१ रुपये, काय होतं यामागचं कारण

पण एकता कपूरने सुशांत सिंग राजपूतचे हसणे पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. एकता म्हणाली की, 'सुशांतला पवित्र रिश्ता'मध्ये आणण्यासाठी खूप विनवणी करावी लागली. पण सुशांतचे स्मितहास्य लाखो हृदयांवर राज्य करेल असे म्हणत एकता कपूर वाहिनीला पटवून देऊ शकली.

यानंतर सुशांतला शोमध्ये 'मानव'च्या भूमिकेत कास्ट करण्यात आले. या मालिकेत सुशांतसह अंकिता लोखंडे 'अर्चना'च्या मुख्य भूमिकेत होती. अशा प्रकारे टीव्ही मालिकांच्या इतिहासातील सर्वात रोमँटिक जोडप्याची कहाणी सुरू झाली. हा प्रवास व्यावसायिक जीवनात तसेच वैयक्तिक जीवनातही चालू राहिली.

यानंतर सुशांतने मागे वळून पाहिले नाही. त्याने त्याच्या पहिल्याच मुख्य भूमिकेतून हे स्पष्ट केले होते की अभिनेत्यामध्ये खूप क्षमता आहे आणि तो खूप पुढे जाईल. आणि त्याने तसे करून सुद्धा दाखवले. काई पो छे, छिछोरे, एमएस धोनी: एन अनटोल्ड स्टोरी, सोनचारैया आणि केदारनाथ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले.

'दिल बिचारा' हा त्यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. अभिनेत्याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी या चमचमणाऱ्या ताऱ्याने आपली चमक पसरवून सिने जगताचा निरोप घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com