
Aashay Kulkarni: छोट्या पडद्यावरील महत्वाची भूमिका साकारणारा आशय कुलकर्णी नेहमीच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला 'व्हिक्टोरिया' चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटात सोनाली आणि आशय सोबत पुष्कर जोगही मुख्य भूमिकेत आहे. पण सध्या आशय एका वेगळ्याच कारनाम्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. त्यामध्ये आशय म्हणतो, मी कुत्र्याचं पिल्लू समजून डुक्कराचं पिल्लू घरी आणलं. डुकराचं पिल्लू बाल्कनीत ठेवून त्याला बिस्कीट वगैरे खाऊ घातलं होतं.
रात्री बाबा बाहेरुन घरी आले, आणि त्यांना घरात काहीतरी आवाज ऐकू आला. त्यांना वाटलं की, घरात बेडखाली उंदीर आहे. त्यांनी सर्व घरात पाहिलं पण काहीही नव्हतं. म्हणून त्यांनी बाल्कनीचा दरवाजा उघडुन ठेवला होता. त्याला बांधून ठेवलं असल्याने डुक्कराचं पिल्लू जरा बावचळलेलं होतं.
त्याला सोडल्यानंतर घरभर सर्व ठिकाणी पाळायला लागलं, इतकंच नाही तर त्या पिल्लाने देवघरात जाऊन सगळे देव पाडले. आणि इकडे तिकडे धावू लागला. पुढे रागातच बाबानी झोपतेच आशयला बेदम मारलं. त्यानंतर आईने मला कित्येकदा कुत्र्याचं पिल्लू आणायचं का असं विचारलं. पण बाबांच्या भीतीपोटी मी नाही म्हणायचो”, असं म्हणत आशयने त्याच्या बालपणीचा मजेशीर किस्सा सांगितला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.