स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सुरु होऊन जवळपास २ वर्ष झाली आहेत. आता अखेर ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेने चाहत्यांच्या मनावर फार कमी दिवसांत घर निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, उर्मिला कोठारे आणि तेजस्विनी लोणारीसह अनेक लोकप्रिय कलाकार आहेत.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेनी 'रंग माझा वेगळा' आणि 'आई कुठे काय करते' या सारख्या मालिकांना मागे टाकले आहे. या मालिकेच्या सुरुवातीला स्वरा आणि वैदही यांच्या मधील माय लेकीच्या प्रेमाने प्रेक्षकांच्या मनात जागा केली.
वैदहीच्या मृत्यू नंतर स्वराची मामी तीला चांगली वागणूक देत नसते. त्यामुळे तीचा मामा तीचा संपुर्ण लूक चेंज करुन तीला मुंबईला पाठवतो. स्वरा आपल्या बाबांच्या शोधात मुंबईला येते. पण मुंबईच्या जीवनशैलीमुळे ही चिमुकली रस्ता भटकते आणि चुकीच्या माणसांच्या संपर्कात येते.
त्यावेळी सुप्रसिद्ध गायक मल्हार कामत तिच्या मदतीला धावून येतो आणि तिच्यामधील संगीताच्या आवडीला प्रोत्साहन देत तिला शोसाठी तयार करतो. मात्र, मल्हारच्या कुटुंबीयांना त्याचं आणि स्वराचं नात फारसं पटत नाही म्हणून स्वरा विरुद्ध खूप कट कारस्थान होतात. मात्र दरवेळी मल्हार स्वराच्या पाठीशी अभा असतो.
मागील काही दिवसांच्या भागात वैदही सारखी दिसणारी बाई स्वरा आणि मल्हारच्या आयुष्यात येते. त्याचे आयुष्य पुर्णपणे बदलून जातं. मालिकेमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा मल्हार आणि स्वराच्या नात्याबद्दल सर्वांना कळले. या मालिकेमध्ये आई-मुलीचं नातं, बाबा-मुलीचं नातं छान प्रकारे चित्रित करण्यात आले आहे. आता मात्र या मालिकेच्या शेवटच्या भागाचा शूटिंग देखील झाल्याचे कळत आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेतील कलाकारांनी केलेल्या भावनिक इन्स्टा स्टोरी तुफान व्हायरल होत आहेत.
'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका स्टार प्लसवरील 'कुल्फी कुमार बाजेवाला' या मालिकेची रिमेक आहे. या मालिकेला देखील प्रोक्षकांनी तेवढीच पसंती दिली आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. स्टार प्लसवरील 'कुल्फी कुमार बाजेवाला' या मालिकेत आक्रुती शर्मा मुख्य भूमिका बजावताना दिसली आहे. ही मालिका देखील स्टार प्लसवर २ वर्ष प्रदर्शित होतांना दिसली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.