Dashavatar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dashavatar Collection: दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' हाऊसफुल, रविवारी सर्व रेकॉर्ड मोडले

Dashavatar Box Office Collection Day 3 : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिस गाजवले आहे. चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'दशावतार'12 सप्टेंबरला प्रदर्शित झाला.

'दशावतार' मध्ये दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत.

'दशावतार' ने तीन दिवसांत 4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

12 सप्टेंबरला दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar ) यांचा 'दशावतार' (Dashavatar) चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवले आहे. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वीकेंडला तर सिनेमाने बंपर कमाई केली आहे. 'दशावतार' 2025 मधील सर्वात मोठी ओपनिंग करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. चार दिवसांत चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'दशावतार' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

दिवस पहिला - 58 लाख रुपये

दिवस दुसरा - 1.39 कोटी रुपये

दिवस तिसरा - 2.4 कोटी रुपये

एकूण - 4.37 कोटी रुपये

'दशावतार' स्टार कास्ट

'दशावतार' चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर , महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे, सुनील तावडे आणि विजय केंकरे हे कलाकार झळकले आहेत.

'दशावतार'मधील दिलीप प्रभावळकर यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्यांच्या जबरदस्त अभिनयाने चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. चित्रपटाची गाणी देखील सुपरहिट ठरली आहे. 'दशावतार' ही कोकणातील एक लोककला आहे.'दशावतार' चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आहेत. तीन दिवसांत 'दशावतार' चित्रपटाने 4 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे भविष्यात हा चित्रपट बक्कळ पैसा कमावेल असे चित्र दिसत आहे.

इतर दोन चित्रपट

'दशावतार'सोबत 12 सप्टेंबरला आणखी दोन चित्रपट रिलीज झाले आहे. या चित्रपटांना देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमांचा समावेश आहे. 'आरपार'मध्ये हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर ही नवीन जोडी झळकली आहे. तर 'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये महाराष्ट्राची लाडकी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत खूप काळानंतर एकत्र पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कच्चा लसूण चावून खाल्ल्याने काय होतं?

Maharashtra Live News Update: जालन्यात बंजारा समाजाचा प्रचंड मोर्चा

Sangli Fake IT Raid: सांगलीत स्पेशल 26 स्टाईल लूट! बनावट आयकर अधिकाऱ्यांची डॉक्टरच्या घरावर धाड; कोट्यावधी रुपये लंपास|VIDEO

Hingoli : हिंगोलीत पावसाचा कहर! चार दिवसांपासून १० गावांचा संपर्क तुटला | VIDEO

तुमच्या दररोजच्या 'या' सवयी किडनी करतायत फेल; आजच बदला

SCROLL FOR NEXT