Char Chaughi Drama Last Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Char Chaughi : स्त्री-पुरुष संबंधांवरील नाटक 'चारचौघी' घेणार निरोप, शेवटचा प्रयोग कधी आणि कुठे?

Char Chaughi Drama Last Show : मराठी रंगभूमीवर सन १९९० ते २००० पर्यंत दबदबा राखणारा आणि ३१ वर्षांनंतर नव्या कलाकारांसह दमदार कमबॅक करणारा चारचौघी नाटक आता पुन्हा निरोप घेणार आहे.

Chetan Bodke

मराठी रंगभूमीवर सन १९९० ते २००० पर्यंत दबदबा राखणारा आणि ३१ वर्षांनंतर नव्या कलाकारांसह दमदार कमबॅक करणारा 'चारचौघी' नाटक (Chaar Choughi) आता पुन्हा निरोप घेणार आहे. त्याचा अखेरचा प्रयोग पुण्यात होणार आहे.

बऱ्याच दिवसांनी रंगमंचावर 'चारचौघी'सारखं एक उत्तम कथानक असलेलं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि या नाटकाला अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पण आता हेच नाटक त्यांचा निरोप घेणार आहे.

रसिकांचं मन घुसळून काढणारी कथा

हे स्त्री-पुरुष संबंधांवर नवीन प्रकाश टाकते. ‘चारचौघी‘ हा चार महिलांचा प्रवास आहे. नाटक पाहताना ज्यांनी पुरुषप्रधान समाजाची बंधने झटकून टाकली आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या साक्षात्काराच्या वाटेवर वाटचाल केली. त्या स्त्रीयांच्या भावभावना, त्याचं अंतर्मन याचा लेखाजोखा आज तीन दशकानंतरही आपल्याला थेट भिडतो हा समाजाच्या मनोवृत्तीचा विजय की पराभव? हा प्रश्न रसिकांना निश्चितच सून्न‌ करून सोडेल, असं हे नाटक आहे.

या नाटकाची संपूर्ण कथा एका महाग्रंथातून प्रकाशित केली जाणार आहे. जी एका रंगभूमीची दखल घेतेय. यात एका वळणावर असलेल्या या 'चारचौघी' जगावेगळ्या आहेत. समाज जीवनाचा आरसा दाखवणाऱ्या या चार महिला आहेत. या नाटकाचा विषय तसा चाकोरीबाहेरचा आणि वास्तवाच्या गाभ्याला हात घालणारा आहे, तितकाच तो धक्कादायक आहे. या नाटकात एक आई आणि तिच्या तीन मुली आपापल्या विचारसरणीनुसार त्यांच्या आयुष्यात अत्यंत असामान्य निर्णय घेतात, अशी कथा दाखवण्यात आली आहे.

रंगभूमी दणाणून सोडली!

या नाटकाने १९९०-२००० मध्ये रंगभूमी गाजवली होती. १९९१ साली १५ ऑगस्ट या दिवशी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात याचा शुभारंभ झाला. २०२२ मध्ये ३१ वर्षांनंतर ‘चारचौघी’ पूर्णपणे नवीन कलाकार आणि तंत्रज्ञांसह रंगभूमीवर आलंय. चारचौघी नाटकाच्या या बातमीमुळे प्रेक्षक आंनदी आणि उत्सुक होते.

या नाटकाच्या सभागृहात हाऊसफुल गर्दीमुळे सोनेरी दिवस अवतरले. जुनं ते सोनं, त्याचाही एक रसिक वर्ग आहे. याचा अनुभव साऱ्यांनी घेतला. मात्र आता चारचौघी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रसिक प्रेक्षकांना एक धक्काच दिला आहे. या नाटकाचा शेवटचा प्रयोग रविवारी, १ सप्टेंबरला पुण्यातील राम कृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे.

हे नाटक इतकं यशस्वी का झालं?

या नाटकाचे लेखक प्रशांत दळवी असून, नाटकाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. या नाटकामध्ये अनेक सुंदर आणि अनुभवी कलाकारांनी काम केलेलं असून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे या दिग्गज अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबतच त्यांच्या पतींच्या भूमिकेत अभिनेते श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर आहेत.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT