Tadka Recipe : साध्या डाळीला चवदार बनवण्यासाठी द्या 'हे' ५ झणझणीत तडके, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डाळ बनवणे

भातावर लागणारी डाळ ही प्रत्येक घरात केली जाते. तसेच डाळीला अनेक प्रकारच्या फोडण्या देखील दिल्या जातात.

Indian dal | GOOGLE

साधे वरण

बिना तडक्याची डाळ चवीला एकदमच साधी लागते. प्रत्येकालाच साधे वरण आवडते असे नाही. जाणून घ्या डाळीला दिले जाणारे ५ विविध प्रकारचे झणझणीत तडके.

Simple Dal | GOOGLE

डाळ शिजवा

सगळ्यात आधी डाळ स्वच्छ धुवून घ्या, मग ती कुकरमध्ये टाका आणि त्यात चवीनुसार, मीठ, हळदआणि पाणी टाकून कुकर बंद करा.

Cooker | GOOGLE

शिजवून घ्या

तुरडाळ ३ ते ४ शिट्यांमध्ये शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यावर डाळ फेटून घेवून मऊ करा आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. मग तडका द्या.

Soft dal | GOOGLE

जीरे- हिंग

एक पॅन घ्या, त्यात थोडे तूप टाका आणि त्यावर जीरे टाकून हलकेसे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर थोडे हिंग टाकून २ सेकंद नंतर गॅस बंद करा. आता तयार केलेला तडका डाळीवर द्या.

jeera hing tadka | GOOGLE

कांदा-लाल मिरची तडका

तुरीच्या डाळीत कांदा आणि लाल तिखट पावडर देखील घालू शकता. कांदा बारीक चिरून घ्या, तुपात घाला आणि सोनेरी होऊ द्या. नंतर, लाल तिखट घाला आणि मसाला टाका.

Onion Mirchi tadka | GOOGLE

लसूण चटणी तडका

लसणाचे लहान तुकडे करा. तूप घाला आणि लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर, तुरीच्या डाळीत लसूण मसाला घालून झणझणीत फोडणी द्या.

Garlic tadka | GOOGLE

लाल मिरची तडका

तुम्ही डाळीत लाल मिरचीचा फोडणी देखील देऊ शकता. एका पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात सुक्या लाल मिरच्या घाला आणि त्या तळून घ्या. नंतर त्यावर डाळ घाला.

Red Chili Tadka | GOOGLE

कढीपत्ता तडका

दक्षिण भारतीय पद्धतीने डाळ मऊ करण्यासाठी, एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात कढीपत्ता आणि लाल मिरच्या घाला आणि डाळीला तडका द्या.

curry leaves tadka | GOOGLE

Health Care : रात्री आईसक्रीम खाल्याने काय होते? जाणून घ्या

Ice Cream | GOOGLE
येथे क्लिक करा