अभिनेत्री जेनेलिया देशमुखने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. 'लय भारी' आणि 'वेड' चित्रपटाच्या माध्यमातून जेनेलियाने मराठी सिनेसृष्टीत डेब्यू केलं. जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या करियर मधल्या काही रंजक किस्से जाणून घेणार आहोत.
जेनेलियाचे लग्नापूर्वी जेनेलिया डिसोझा हे नाव होतं. तिने आपल्या अभिनयाचा ठसा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, तमिळ, तेलूगु आणि मराठी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा तिने उमटवला. अभिनेत्रीचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी झाला असून ती ३७ व्या वर्षी पदार्पण करते.
लग्नानंतर जेनेलिया फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय दिसली नाही. फार क्वचित चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जेनेलिया शेवटची 'ट्रायल पिरियड' चित्रपटामध्ये दिसली होती. गेल्या १५ वर्षांपासून जेनेलिया फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.
जेनेलिया एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती खेळातही तरबेज आहे. जिनिलिया डिसुझा शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात राज्यस्तरीय धावपटू, आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू होती.
५ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईत जन्मलेली जेनेलिया एका कॅथलिक कुटुंबातील आहे. जेनेलियाने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. जेनेलिया एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक राज्यस्तरीय धावपटू आणि फुटबॉलपटूही आहे. तिचे हेच विविध गुण तिच्या मुलांमध्येही उतरले आहेत. जेनेलियाने वयाच्या १५ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री घेतली. त्यानंतर २००३ मध्ये रिलीज झालेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले.
जेनेलियासाठी तिचा हा पहिलाच चित्रपट आयुष्यामध्ये अगदी खास ठरला. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुखही प्रमुख भूमिकेत होता. दोघांनीही 'तुझे मेरी कसम' ह्या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू केले. या चित्रपटाच्या शुटिंगवेळी दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. पण नंतर त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. पहिल्याच नजरेत रितेश जेनेलियाच्या प्रेमात पडला. आणि तेव्हापासून त्यांच्या लव्हलाईफला सुरूवात झाली. 'तुझे मेरी कसम' ह्या चित्रपटाच्या वेळी जेनेलिया १६ वर्षांची आणि रितेश २४ वर्षांचा होता.
दोघांनीही एकमेकांना १० वर्षे डेट केले. डेटिंग केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधले. रितेश आणि जेनेलियाला राहिल आणि रियान नावाचे दोन मुलं आहेत. ते बालपणापासूनच फुटबॉलचं प्रशिक्षण घेत आहेत. ते कायमच आपल्या संस्कारांमुळे चर्चेत राहिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.