केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, लष्कराचे जवान, स्थानिक पोलिसांकडून अजूनही बचावकार्य वेगाने सुरू आहे. अपघातग्रस्त कुटुंबाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर पुढे सरसावले आहेत. या यादीमध्ये टॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश झाला आहे.
टॉलिवूड सेलिब्रिटी नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन, मोहनलाल, मोहनलाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी लाखो रुपयांची देणगी दिली आहे. आता या यादीत अभिनेता अल्लू अर्जुनचाही समावेश झाला आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनने वायनाडमध्ये झालेल्या आपत्तीग्रस्तांना २५ लाख रुपयांची मदत केली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित 'एक हात मदतीचा' दिला आहे. शिवाय अल्लू अर्जुनने भूस्खलनाच्या घटनेबाबत दु:खही व्यक्त केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनने लिहिलंय की, "वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप दु:ख झालं आहे. केरळ राज्यातील नागरिकांनी माझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. मला केरळच्या सीएम रिलीफ फंडात पुनर्निर्माणाच्या निधीमध्ये २५ लाख रुपये देणगी देऊन योगदान द्यायचे आहे. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना."
त्यासोबतच तात्काळ मदत आणि पुनर्निर्माणाच्या प्रयत्नांसाठी अभिनेता मोहनलालने ३ कोटींची घोषणा केली. त्यासोबतच त्यांनी बाधित भागाला भेट देऊन त्याची झलक सोशल मीडियावरही दाखवली. वायनाडमधील मदत निधीसाठी टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी २० लाख रुपयांची देणगी दिली होती. वायनाडमध्ये सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. यापूर्वी ही अनेक टॉलिवूड सेलिब्रिटींनी मदत केली आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनबद्दल सांगायचं तर, अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड 'पुष्पा २' चित्रपट यावर्षी ६ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही मुख्य भूमिकेत आहे. तर फहद फाझिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, 'पुष्पा २'च्या सेटवरील क्लायमॅक्स फाईट सीनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ काही कलाकार आणि क्रू मेंबर्सने सीन शूट केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.