प्रत्येकाचा एक तरी जिवलग मित्र असतो. ज्याच्याशी आपण किती भांडलो, किती रुसलो तरी मैत्री काही कमी होत नाही. ती दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत जाते. बॉलिवूडमध्येदेखील असे काही सेलिब्रिटी आहेत जे भांडतात, रुसतात, परंतु आजही एकमेकांसोबत आहेत.
करण जौहर आणि काजोल देवगण
करण जौहर आणि काजोल यांची मैत्री 'कभी खुशी कभी गम' चित्रपटापासून सुरू झाली. करण जौहरच्या अनेक चित्रपटाना काजोल लीड करत होती. ऐकेकाळी अजय आणि करण यांच्यातील भांडणामुळे दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पडली होती. परंतु नंतर दोघांमधील भांडण मिटले.
फराह खान आणि शाहरूख खान
बॉलीवूडचे बेस्ट फ्रेंन्ड म्हणून फराह खान आणि शाहरुख खान यांची ओळख आहे. अनेक चित्रपटात दोघांनी काम केले आहे. परंतु पाच वर्ष या दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरु होते. नंतर दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली.
करीना कपूर, अमृता अरोरा आणि मलायका अरोरा
करीना, अमृता, मलाइका आणि करिश्मा यांच्या मैत्रीच्या चर्चा खुप रंगल्या होत्या. या चौघी एकत्र खुप एन्जॉय करायच्या. परंतु काही काळ त्यांच्यात वाद झाले होते, कालांतराने ते मिटले आणि आज चौघी खास मैत्रिणी आहेत.
ऋतिक रोशन आणि फरहान अख्तर
ऋतिक रोशन आणि फरहान अख्तर यांची मैत्री लहानपणापासून चर्चेचा विषय ठरली आहे. दोघांच्या वाढदिवसातदेखील एक दिवसाचं अंतर आहे. दोघांनीही लहानपणीचे फोटो, डान्सचे व्हिडिओ अनेक वेळा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसंच अनेक चित्रपटात ते दोघे एकत्र काम करतानाही पहायला मिळाले आहेत.
सलमान खान आणि शाहरूख खान
मैत्री निभावण्यामध्ये सलमान खानचं नाव नेहमी चर्चेत असते. सलमान आणि शाहरून यांच्या मैत्रीच्या चर्चा खूप रंगतात. परंतु काही कारणामुळे दोघे अनेक वर्ष एकमेकांना बोलत नव्हते. परंतु 2014 मध्ये बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये दोघांनी एकमेकांना गळाभेट घेत वाद मिटवले. आज ते दोघे चांगले मित्र आहेत.
अजय देवगन आणि रोहित शेट्टी
अजय देवगन आणि रोहित शेट्टी लहानपणापासून मित्र आहेत. अजय- रोहित यांच्या मैत्रीत देखील अनेक वेळा वाद झालेलं पाहियला मिळाला. परंतु आजची त्यांच्या मैत्रीच्या चर्चा होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.