अजय देवगण एक यशस्वी बॉलिवूड अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता. 90 च्या दशकात दोन दुचाक्यांवर पाय ठेवून स्टंट करणारा कॉलेजकुमार असो वा आता माझी सटकली म्हणून गुंडांना सळो की पळो करणारा 'बाजीराव सिंघम' अजय देवगण कायम प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनला. त्याची केसांची ठेवण, मान तिरकी करून चालण्याची पद्धत ही खास ठरली. पण ही माझी स्टाईल नाही, असं खुद्द अजयनंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. या मागचं गुपितही त्याने सर्वांसमोर उघड केलं.
अजयनं आजवर शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अभिनयासाठी त्याला दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलं आहे. फिल्मफेअर पुरस्कारही त्याला मिळालेत. जिगर, संग्राम, दिलजले यासारख्या सिनेमांनंतर तो ॲक्शन हिरो म्हणून नावाजला गेला. एक्शन कॉमेडीही त्यानं केली. यात कपाळावर आलेले केस आणि मान तिरकी करून चालण्याची त्याची शैली सर्वांना आवडली. याबाबत अजयने एका मुलाखतीत खुलासा केला.
'औरों में कहां दम था' हा सिनेमा 2 ऑगस्ट प्रदर्शित झाला आहे. यात तब्बू आणि अजय मुख्य भूमिका करत आहेत. या दोघांनी या आधीही अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दोघांनी अनेकांना मुलाखती दिल्या होत्या. त्यावेळी तब्बूने अजयच्या तिरक्या मानेविषयी भाष्य केलं. एका सिनेमादरम्यान आम्ही कॅमेरा कसा लावायचा, आमचा हिरो आणि हिरोईन दोघेही मान तिरकी करून चालतात, असं अब्बास मस्तान यांनी म्हटल्याचं तब्बू म्हणाली.
अजयने नेमका काय खुलासा केला?
कपाळावरच्या डोळ्यांपर्यंतच्या लांब केसांबद्दल अजय म्हणतो, त्यावेळी हिरोसाठी केशरचनाकार (hair styalist) नसायचे. ते पहिल्यापासून तसेच होते. अंघोळ केल्यावर जसे केस राहायचे तसंच आम्हाला चित्रीकरण (Shooting) करावं लागायचं. त्यानंतर तिरक्या मानेबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही त्याने दिलं.
माझे खांदे उतरते आहेत आणि मान थोडी तिरकी आहे, हे मला माहित आहे. जन्मत: मी तसाच आहे. कोणत्याही दिग्दर्शकाने याबद्दल कधीच काही तक्रार केली नाही. काहींना ती माझी शैली वाटते, माझी स्टाईल वाटते पण तसं नाही. माझ्या शरीराची ठेवण तशीच आहे, असा खुलासा अजयने केला आहे.
काही का असेना.. आपल्याला बुवा अजयची ती स्टाईल खूप आवडते, तुम्हाला आवडते???
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.