पुण्यातील बालगंधर्व रंगंमदिरात अजित पवारांच्या हस्ते तिसरी घंटा वाजली...

सुमारे १९ महिन्यानंतर राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह आजपासून सुरू झाले आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आज सुरू झालं आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगंमदिरात अजित पवारांच्या हस्ते तिसरी घंटा वाजली...
पुण्यातील बालगंधर्व रंगंमदिरात अजित पवारांच्या हस्ते तिसरी घंटा वाजली...सागर आव्हाड
Published On

पुणे: सुमारे १९ महिन्यानंतर राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह आजपासून सुरू झाले आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आज सुरू झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रंग मंदिराची तिसरी घंटा वाजवण्यात आली. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे. नाट्यगृहे सुरु झाल्याने नाट्य रसिकांना आता रंगभूमीचा आस्वाद घेता येणार आहे. (The third bell rang at the hands of Ajit Pawar at Balgandharva Rangmandir in Pune)

हे देखील पहा -

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अजित पवारांची एन्ट्री झाली तेव्हा गेटवर संबळ वादक आणि वासुदेव दोघे त्यांच्या स्वागताला उभे होते. अजित पवार यांना शिंदे पगडी ,कवड्याची माळ आणि तलवार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अजित पवारांनी कलाकारांची विचारपूस करत वासुदेवाच्या तब्येतीची विचारपूस केली आणि वासुदेवाच्या वाढलेल्या पोटाला हात लावत पोट कमी करण्याचा सल्ला दिला. पवार म्हणाले की, "गेले एकोणवीस महिने कलाकारांना हाल सोसावे लागले आहेत. त्यामुळे कलाकारांच्या पोटाची काळजी आम्हाला आहे. पुढील काळात कलाकारांसाठी आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी या कार्यक्रमातील आपल्या भाषणात दिलं. रंग मंदिराची तिसरी घंटा अजित पवारांच्या हस्ते वाजवण्यात आली. त्यानंतर गणरायाचं गाणं आणि त्याला कारण मी सादर केलं एक छोट नाटके सादर करण्यात आलं. आणि त्यानंतर लावणी कलाकारांनी चला जेजुरीला जाऊ ही लावणी सादर केली गेली.

पुण्यातील बालगंधर्व रंगंमदिरात अजित पवारांच्या हस्ते तिसरी घंटा वाजली...
जय जवान! तिन्ही दलातील सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दिग्दर्शक-लेखक नागराज मंजुळे, मिमिक्री आर्टिस्ट योगेश सुपेकर, अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेत्री वनमाला बागुल, अभिनेत्री पूजा पवार, ऋतुजा मराठे तसेच अनेक चित्रपट, नाट्य सृष्टीतील कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजनाचा आणि कलाकारांच्या कला सादरीकरणाचा व अजित पवारांच्या मनोगताचा कार्यक्रम झाला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com