संतोष शाळिग्राम, नवी दिल्ली
नवी दिल्ली: देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सुट्टीच्या काळात अतिरेकी वा समाज कंटकांनी हल्ला केला, तरी संबंधित सैनिक 'ऑन ड्युटी' असल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे. यादरम्यान त्याला गंभीर दुखापत किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्यासाठी दिले जाणारे आर्थिक लाभ हे सैनिक किंवा त्याच्या कुटुंबीयांना मिळू शकतील. (Jai Jawan! A big decision of the Ministry of Defense for the soldiers of the three forces)
हे देखील पहा -
संरक्षण मंत्रालयाने सुट्टी दरम्यान सैनिकांवर झालेल्या हल्ल्याबाबत हे स्पष्टीकरण जारी केले आहे. रजेवर असलेल्या सैनिकावर अतिरेकी किंवा समाजविघातक घटकांनी हल्ला केला आणि तो मारला गेला, तर अशा प्रकरणांना कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्याचे मानले जाईल. त्यानुसार भरपाई दिली जाईल. हा आदेश तिन्ही सैन्य दलांसाठी लागू करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत लष्करी जवानांवर हल्ले वाढले आहेत. विशेषतः काश्मीरमध्ये अशा घटना अधिक घडल्या आहेत. भारतीय सैनिक सुट्टीवर असताना त्यांना लक्ष्य केलं जातंय. अशा स्थितीत सैनिकाचा मृत्यू झाल्यास काय, याबाबत आतापर्यंत स्पष्टता नव्हती. संरक्षण मंत्रालयाने आता मात्र त्याचं धोरण निश्चित केलंय. यापुढे एखादा सैनिक रजेवर त्याच्या घरी किंवा इतरत्र गेला असेल आणि या दरम्यान तो अतिरेकी किंवा समाजविघातक घटकांच्या हल्ल्यात ठार झाला, तर कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्याचे मानले जाणार आहे. रजेवर असताना व्यक्तिगत वैरामुळे सैनिकावर कोणताही हल्ला झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, तर त्याला ऑन ड्युटी मानले जाणार नाही. आर्थिक भरपाई देखील मिळणार नाही, असंही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलंय.
याशिवाय, आणखी एक दिलासा संरक्षण मंत्रालयानं सैनिकांना दिलाय. सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थांनी आयोजित स्थानिक वा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, गिर्यारोहणाच्या मोहिमा यांत सैनिक भाग घेत असतात. अशा परिस्थितीत सैनिक ज्या सैन्य दलात कार्यरत आहे, त्यात सेवेच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीने या स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल, तर तो सैनिक या स्पर्धांच्या काळात ऑन ड्युटी मानला जाईल. या काळात त्याला दुखापत झाल्यास, अपंगत्व आल्यास वा त्याचा मृत्यू झाल्यास त्यांना भरपाई मिळणार आहे. व्यक्तिगत छंद जोपासताना वा खासगी स्पर्धांच्या काळात अपघात झाल्यास मात्र सैनिक कोणतीही भरपाई मिळण्यास पात्र नसेल.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.