CHYD  SAAM TV
मनोरंजन बातम्या

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

Chala Hawa Yeu Dya 2 Release Date : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. अशात आता कार्यक्रमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Shreya Maskar

'चला हवा येऊ दया'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'चला हवा येऊ दया'च्या नवीन पर्वाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'चला हवा येऊ दया' पहिल्या सीझनने संपूर्ण जगाला खळखळून हसवले आहे. नवीन पर्वात 'चला हवा येऊ दया'च्या (Chala Hawa Yeu Dya 2) सूत्रसंचालनाची धुरा मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकर साकारणार आहे. या पर्वामध्ये अनेकांचे आवडते डॉ. निलेश साबळे पाहायला मिळणार नाही आहे.

'चला हवा येऊ दया'मध्ये आता टीम पाहायला मिळणार आहेत. यात श्रेया बुगडे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे टीमचे मुख्य असणार आहे. त्यामुळे कॉमेडीची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. 'चला हवा येऊ दया'च्या या नवीन पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सच आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. चाहते शोसाठी खूप आतुर असल्याचे दिसत आहे.

'चला हवा येऊ दया' रिलीज डेट काय?

"कॉमेडीचं गँगवॉर गाजणार, महाराष्ट्र आता खळखळून हसणार! चला हवा येऊ दया - कॉमेडीचं गँगवॉर" असे कॅप्शन पोस्टला देण्यात आले आहे. 'चला हवा येऊ दया'चे नवीन पर्व 26 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर शनिवार-रविवार रात्री 9 वाजता 'चला हवा येऊ दया' पाहायला मिळणार आहे.

'चला हवा येऊ दया'च्या प्रोमोमध्ये सर्व कलाकारांची अतरंगी स्टाइल पाहायला मिळत आहे. या शोनं 10 वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आताच्या नवीन सीझनमध्ये कोण-कसा धमाकुळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. कॉमेडीचा डॉन कोण होणार? हे पाहण्यासाठी अवघ्या महाराष्ट्र वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT